Gold : सोनं अंगावर घालण्यापूर्वी 'या' 10 प्रमुख गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हाला होईल नुकसान..!
What to be careful about when wearing gold : सोने चांदी हिरे रत्न माणिक मोती या वस्तूंचे नाव जरी निघाले तरी प्रत्येकाच्या भुवया उंचावतात, नाही का?, विशेषत: महिला वर्गांना सोन्याचे विशेष आकर्षण असते. सोने चांदी खरेदी करताना अनेक नवनवीन प्रकारचे डिझाईन आजकाल शोधल्या जातात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, सोनं अंगावर घातलाना काही प्रमुख गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे, नाहीतर तुम्हाला त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होण्याची शक्यता वर्तविली जाते.
अनेक रत्ने सोन्याच्या अंगठीत किंवा साखळीत बसवून घातली जातात. सोन्याचे हे गुरु ग्रहाशी संबंधित आहे. या धातूपासून बनवलेली अंगठी किंवा दागिने घालल्याने केवळ शारीरिक फायदे मिळत नाहीत तर आनंद आणि समृद्धी देखील वाढते. सोने घालण्याचे काही नियम आहेत. रत्नशास्त्रानुसार, योग्य पद्धतीने आणि शुद्धीकरणानंतर सोने परिधान करणे फायदेशीर आहे. सोने घालताना कोणत्या खास गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, यावर आपण आज नजर टाकणार आहोत..!

सोने घालण्यापूर्वी या १० महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
- ज्योतिषांचा सल्ला घ्यावा : सोने सर्वांनाच शोभत नाही. म्हणून, सोने घालण्यापूर्वी, ज्योतिषी किंवा कुंडली तज्ञाचा सल्ला घ्या. कुंडलीतील ग्रहांची स्थिती तपासूनच सोने घालावे हे लक्षात ठेवा.
- या दिवशी सोने घालावे : धार्मिक मान्यतेनुसार, रविवार, गुरुवार, बुधवार आणि शुक्रवारी सोने परिधान करणे शुभ मानले जाते.
- अक्षय तृतीयाचा शुभ दिवस : अक्षय्य तृतीयेसारख्या शुभ दिवशीही सोने घालावे. तर याच दिवशी सोने खरेदी करण्याचा विशेष मुहूर्त मानला जातो.
- सोने शुद्ध करा : सोने घालण्यापूर्वी ते शुद्ध करा. गंगाजल आणि कच्च्या गायीच्या दुधाच्या मिश्रणात सोने काही वेळ भिजत ठेवा. नंतर ते स्वच्छ करा आणि भगवान विष्णूंच्या चरणी ठेवा. पूजा केल्यानंतर ते घाला.
- एकाग्रतेसाठी उपयुक्त : एकाग्रता वाढवण्यासाठी, तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी घातली जाते. त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता.
- अपत्य प्राप्तीचा योग : अपत्य सुख प्राप्त होण्यासाठी अनामिका बोटात सोने घालावे, असे देखील काही ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे.
- हे आजार असतील काळजी घ्या : जर तुम्हाला पोट किंवा लठ्ठपणाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही सोने घालणे टाळावे, अशी एक धारणा आहे.
- सोने कसे वापरले जाते : सोन्याचे दागिने बहुतेकदा कमरेच्या वरच्या भागात घातले जातात.
- सोनं कोणत्या हातात शुभ मानले जाते : उजव्या हातात सोने घालणे शुभ मानले जाते.
- या व्यावसायिकांनी टाळावे : जर कोणी कोळसा, लोखंड आणि शनीशी संबंधित व्यवसायात गुंतलेला असेल तर त्याने सोने घालणे टाळावे.
(विशेष सूचना- सदर माहिती ही इंटरनेटवरील स्त्रोतावरुन दिलेली आहे, वनइंडिया मराठी यासंदर्भात कोणताही दावा करत नाही, प्रत्यक्षात वापर करताना संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)












Click it and Unblock the Notifications