Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Loan News :सोन्यावर कर्ज घेणे होऊ शकते महाग! 'ही' आहेत कारणे घ्या जाणून

Gold Loan News : सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. जर तुम्ही सोन्यावर कर्ज घेणार असाल तर आताच्या तुलनेत येत्या काही दिवसांत तुम्हाला कर्ज घेणे महाग पडणार आहे.

जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुवर्ण कर्जावरील मसुदा मार्गदर्शक तत्त्वे सध्याच्या स्वरूपात लागू केली गेली, तर बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांवरील (NBFCs) खर्चाचा बोजा वाढू शकतो. त्यामुळे या चर्चा होत आहेत.

Gold Loan News

गोल्ड लोन अर्थात सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांची भारतात कमी नाही. कारण कुणाला कधी ना कधी आर्थिक गरज भेडसावतेच आणि कर्ज आयुष्यात एकदा तरी घ्यावेच लागते. ज्याच्याकडे तारण ठेवण्यासाठी कोणतीही मालमत्ता नाही किंवा अन्य कारणांमुळे अनेकांना सोन्यावर कर्ज घ्यावे लागते. अशातच सोन्यावर कर्ज घेताना थोडी जास्त कसरत करावी लागू शकते. बँकिंग क्षेत्रातील लोक आणि तज्ज्ञांनी ही भीती व्यक्त केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुवर्ण कर्जावरील मसुद्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, बँका आणि एनबीएफसींना त्यांच्या सर्व शाखांमध्ये मानक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. याशिवाय, सोन्यासाठी कर्ज देणाऱ्या युनिट्सनाही ठोस वसुली आणि गणना पद्धती अवलंबावी लागतील जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या थकबाकीला वाव राहणार नाही.

सध्या संकलन, कागदपत्रे आणि गणना प्रक्रिया इत्यादीवरील खर्च 2 टक्के आहे. पण जर RBI च्या मसुद्याची मार्गदर्शक तत्त्वे त्यांच्या सध्याच्या स्वरूपात लागू केली गेली तर हा खर्च 4-5 टक्क्यांपर्यंत वाढेल अर्थात शाखांना मानकीकरण प्रक्रिया लवकर पूर्ण करावी लागेल, ज्यामुळे सोन्याच्या कर्ज प्रक्रियेची किंमत वाढेल.

बिझनेस स्टँडर्डने यासंदर्भात वृत्त दिले आहे, त्यांच्या वृत्तात म्हटले आहे की, मसुद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कर्ज देणाऱ्या संस्थांना तारण ठेवलेल्या सोन्याची शुद्धता, त्याचे वजन (स्थूल आणि निव्वळ दोन्ही) इत्यादी तपासण्यासाठी एक मानक प्रक्रिया तयार करावी लागेल. ही पद्धत संबंधित कर्जदात्याच्या सर्व शाखांमध्ये समान रीतीने लागू होईल. याशिवाय ज्यांचे पूर्वीचे काम निर्दोष राहिले आहे, अशा सोन्याच्या परीक्षणासाठी संस्थांना अशा परीक्षकांची नियुक्ती करावी लागणार आहे.

या सर्व परिस्थितीमुळे बँका आणि एनबीएफसीच्या परिचालन खर्चात वाढ होईल कारण त्यांना समीक्षक म्हणून तज्ज्ञ लोकांना नियुक्त करावे लागेल. जी खर्चिक बाब राहील.

हेही वाचा : Gold price news: खरंच सोने 50 हजारांपर्यंत स्वस्त होणार का? दर कमी होण्यासाठी या 4 गोष्टी ठरतील कारण

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+