Gold price news: खरंच सोने 50 हजारांपर्यंत स्वस्त होणार का? दर कमी होण्यासाठी या 4 गोष्टी ठरतील कारण
Gold Rate news : अलिकडे कधी नव्हे एवढी सोन्याची चर्चा होत आहे ती त्याच्या किमतीवरुन भाव कमी होणार की वाढणार, सोने आताच खरेदी करावे की थांबावे, सोन्याचे भाव खरंच कमी होणार का अशा एक ना अनेक प्रश्नांचे काहुर मनात आहे. आज आम्ही सोन्यासंदर्भात मोठी अपडेट देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही सोन्याच्या गुंतवणुकीसंदर्भात काही ठोकताळे लावू शकाल.
सोन्याचे भाव कमी होणार का?
सोन्याचा भाव 56 हजारांपर्यंत खाली येऊ शकतात असा दावा केला जात आहे, म्हणजेच सध्याच्या किमतीपेक्षा 38 टक्क्यांनी कमी होऊ शकतात.

सध्या सोन्याचे भारतातील भाव काय?
सध्या भारतात सोन्याचा भाव 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. यूएस-आधारित मॉर्निंगस्टार विश्लेषकांचा असा विश्वास आहे की पुढील काही वर्षांत सोन्याच्या किमती 38 टक्क्यांनी कमी होऊ शकतात. तसे झाल्यास सध्याच्या भावाच्या तुलनेत सोन्याचे दर 56 हजारांवर येऊ शकतात.
कारण क्रमांक 1 - सोन्याची टंचाई नाही, पुरवठा वाढला
सोन्याची मागणी अलिकडे वाढली असली तरीही सोन्याचा जागतिक पुरवठा झपाट्याने वाढत आहे हे विशेष म्हणजे सोन्याची टंचाई नाहीच..2024 च्या दुस-या तिमाहीत सोन्याच्या खाणीचा नफा प्रति औंस $950 पर्यंत पोहोचला, जो वर्षांतील त्यांची सर्वोच्च आहे. यामुळे जागतिक सोन्याचा साठा 9 टक्क्यांनी वाढला आहे, म्हणून सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात असा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे.
कारण क्रमांक 2 - सोन्याच्या मागणीत घट
सोन्याचे भाव नव्वद हजार रुपये प्रतितोळ्यावर गेल्यानंतर सोन्याच्या पुनर्वापरात वाढ झाली आहे. जुने दागिने घडवून वापरण्याकडे कल वाढला आहे, आता सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे मागणीत घट होत आहे तर दुसरीकडे आस्ट्रेलियाने सोन्याचे उत्पादन वाढवले या दोन गोष्टी अशा आहेत ज्यामुळे सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात.
कारण क्रमांक 3 - बँकांची भुमिका
बहुतांश बँका सोन्याची गुंतवणूक करतात, ते सोने घेऊन ठेवतात परंतु, जागतिक सुवर्ण परिषद अर्थात वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की 71 टक्के मध्यवर्ती बँका त्यांच्या सोन्याचे होल्डिंग वाढवण्याऐवजी कमी करणे किंवा स्थीर ठेवणे अपेक्षित आहे. त्यामुळे साहाजिकच मागणीत घट होईल.
कारण क्रमांक 4 - सोन्याच्या उत्पादनात वाढ
सोन्याच्या किमती घसरण्यामागे अतिरिक्त पुरवठा हे एक कारण असू शकते. कारण, 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत खाणकामाचा नफा $950 प्रति औंसवर पोहोचला आहे. शिवाय, जागतिक साठा 9% ने वाढून 2,16,265 टन झाला आहे.
..मग सोन्याचे दर वाढणार की कमी होणार - दुसरी शक्यता
एकीकडे बाजार विश्लेषक सोन्याचे दर कमी होतील ते 38 टक्क्यांपर्यंत कमी होतील असा अंदाज लावत आहेत तर दुसरीकडे बँक ऑफ इंडिया आणि काही वित्तसंस्था मात्र सोन्याचे भाव वाढतील असे म्हणत आहेत. आगामी दोन वर्षांत सोन्याची किंमत प्रति औंस $3,500 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे, गोल्डमन सॅक्सचा असा विश्वास आहे की या वर्षाच्या अखेरीस सोन्याचे दर प्रति औंस $3,300 पर्यंत पोहोचू शकतो म्हणजे भारतात सोन्याचा भाव 1 लाख रुपये प्रति ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो.












Click it and Unblock the Notifications