एस्सारचे सहसंस्थापक शशी रुईया यांचे निधन, कसा होता शशी रुईया यांचा कार्यकाळ? वाचा
Shashi Ruia passed away- भारतीय उद्योग विश्वातील नावाजलेल्या एस्सार उद्योग समूहाचे सहसंस्थापक शशी रुईया यांचे आज निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. शशी रुईया यांच्या निधनानंतर एस्सार उद्योग समूह तसेच विविध स्थरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. शशी रुईया हे गेल्या अनेक दिवासंपासून आजारी होते. सूत्रांच्या माहितीनुसार 25 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजता मुंबईत त्यांची प्राणज्योत मालवली.

कसा होता शशी रुईया यांचा कार्यकाळ
शशी रुईया यांनी उद्योग जगतात 1965 साली पाऊल ठेवले. वडील नंदकिशोर रुईया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उद्योगविश्वात प्रगती केली. त्यांनी 1969 साली त्यांचे बंधू रवी रुईया यांच्या सोबतीने एस्सार उद्योग समूहाची स्थापना केली. या उद्योग समूहामार्फत स्टील, एनर्जी, शिपिंग, पोर्ट्स आदी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले. शशी रुईया यांच्याकडे एक धोरणी व बुद्धीवान उद्योजक म्हणून पाहिले जात होते.
Shri Shashikant Ruia Ji was a colossal figure in the world of industry. His visionary leadership and unwavering commitment to excellence transformed the business landscape of India. He also set high benchmarks for innovation and growth. He was always full of ideas, always… pic.twitter.com/2Dwb2TdyG9
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2024
नरेंद्र मोदींनीही व्यक्त केला शोक
शशी रुईया यांचे पार्थीव रुईया हाऊसमध्ये अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थीवावर बाणगंगा स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शशी रुईया यांच्या निधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही दु:ख व्यक्त केले. "शशी रुईया हे दूरदृष्टी असलेले उद्योजक होते. त्यांनी भारताच्या उद्योगविश्वाचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या निधन हे दुख:दायक आहे," अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या.












Click it and Unblock the Notifications