58 वर्षांची वाट कशाला? 50 व्या वर्षीही सुरू होऊ शकते पेन्शन!; वाचा EPFO चा 'हा' महत्त्वाचा नियम
EPS 95 pension rules early pension at age 50 epfo : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक कर्मचाऱ्यांना असा समज असतो की, पेन्शन मिळवण्यासाठी वयाची ५८ वर्षे पूर्ण होणे अनिवार्य आहे. मात्र, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) नियमानुसार, तुम्ही वयाच्या ५० व्या वर्षीही पेन्शन सुरू करू शकता. मुदतीपूर्व पेन्शन मिळवण्यासाठी नेमक्या कोणत्या अटी आहेत आणि त्यात किती कपात होते, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

काय आहे EPS-95 योजना?
खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून जो पीएफ (PF) कापला जातो, त्याचा एक भाग कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) जमा होतो. निवृत्तीनंतर सन्मानाने जगण्यासाठी दरमहा ठराविक रक्कम पेन्शन म्हणून मिळण्याची ही सरकारी सोय आहे.
५० व्या वर्षी पेन्शन मिळवण्यासाठी अटी
१. १० वर्षांची सेवा
पेन्शनसाठी पात्र होण्याकरिता कर्मचाऱ्याची किमान १० वर्षे सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे. ही सेवा वेगवेगळ्या कंपन्यांमधील असू शकते, मात्र पीएफ खाते ट्रान्सफर केलेले असावे.
२. वयाची अट
जर तुमची १० वर्षांची सेवा पूर्ण झाली असेल आणि तुमचे वय ५० ते ५८ वर्षांच्या दरम्यान असेल, तर तुम्ही 'अर्ली पेन्शन'साठी (Early Pension) अर्ज करू शकता.
पेन्शनमध्ये होणारी कपात समजून घ्या
५८ वर्षांपूर्वी पेन्शन घेतल्यास ती पूर्ण रकमेने मिळत नाही. नियमानुसार, ५८ व्या वर्षाच्या अलीकडे तुम्ही जितक्या लवकर पेन्शन सुरू कराल, तितकी दरवर्षी ४ टक्के या दराने पेन्शनमध्ये कपात केली जाते.
उदाहरण: जर तुम्ही वयाच्या ५० व्या वर्षी पेन्शन सुरू केली, तर तुमच्या एकूण पेन्शनमध्ये सुमारे २५ ते ३२ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. त्यामुळे आर्थिक तातडी असेल तरच हा पर्याय निवडावा.
फॉर्म आणि प्रक्रिया
- नियमित पेन्शन: ५८ वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शनसाठी Form 10D भरावा लागतो.
- सेवा १० वर्षांपेक्षा कमी असल्यास, जर तुमची सेवा १० वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला पेन्शनऐवजी जमा रक्कम काढायची असेल, तर Form 10C वापरावा लागतो.
महत्त्वाची टीप: नोकरी बदलताना नेहमी 'पेन्शन स्कीम सर्टिफिकेट' (Pension Scheme Certificate) घ्या, जेणेकरून तुमची जुनी सेवा नवीन खात्यात जोडली जाईल.












Click it and Unblock the Notifications