बिनव्याजी कर्ज हवंय काय, मग शासनाच्या 'या' आहेत ढासू योजना, अर्ज कसा करायचा, जाणून घ्या सर्व काही
Do you want an interest free loan these are special government schemes : तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा काही तरी खरेदी करायचे आहे, अशावेळी कर्ज घ्यावे लागते. आजच्या आर्थिक धामधुमीत कर्ज घेणे ही बाब सामान्य झालेली आहे.
परंतु, कर्ज घ्यायचे म्हटल्यावर त्याला व्याजही तसेच लागते. त्यासाठी काही निकष देखील पूर्ण करावे लागतात, तेव्हा कुठे बॅंक तुम्हाला त्यांच्या दारात उभी करते. परंतु, आजच्या लेखात आम्ही तुम्हाला शासनाच्या अशा काही योजनांविषयी सांगणार आहोत, ज्या आधारे तुम्ही बिनव्याजी कर्ज घेऊन तुमची गरज भागवू शकता. तसेच तुमच्या व्यवसायाला चालना देऊ शकता.
भारत सरकारने गरजू नागरिकांसाठी काही विशेष योजना राबवल्या आहेत, ज्या अंतर्गत अत्यल्प किंवा शून्य व्याजदराने कर्ज दिलं जातं. या योजनांमुळे छोट्या व्यापाऱ्यांना, महिलांना, शेतकऱ्यांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळतोय.

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)
2015 साली सुरू झालेली ही योजना लघु व मध्यम व्यवसाय सुरू करणाऱ्या नागरिकांसाठी आहे. या योजनेत 'शिशु' (50,000 पर्यंत), 'किशोर' (50,000 ते 5 लाख) आणि 'तरुण' (5 ते 10 लाख) अशा तीन श्रेणी आहेत.
कर्जाच्या वापरासाठी कोणतीही हमी किंवा गॅरेंटी लागत नाही. बहुतांश प्रकरणांमध्ये व्याजदर अत्यल्प असतो आणि काही वेळा सरकारकडून व्याज अनुदानही दिलं जातं.
मुद्रा कर्जासाठी कोण अर्ज करू शकते?
स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारा कोणताही भारतीय नागरिक PMMY अंतर्गत कर्ज घेऊ शकतो. जर तुम्हाला तुमचा सध्याचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि त्यासाठी पैशांची गरज असेल, तर तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत २० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकता.
तुम्ही PMMY कर्ज कसे मिळवू शकता?
मुद्रा योजनेअंतर्गत (PMMY) कर्जासाठी तुम्हाला सरकारी किंवा बँकेच्या शाखेत अर्ज करावा लागेल. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला घराची मालकी किंवा भाड्याची कागदपत्रे, कामाशी संबंधित माहिती, आधार, पॅन क्रमांक आणि इतर अनेक कागदपत्रे सादर करावी लागतील. ज्या बँकांद्वारे हे कर्ज दिले जात आहे त्यांची माहिती मुद्रा योजनेच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल. फॉर्म ऑनलाइन देखील डाउनलोड करता येतो.
अर्ज करण्याचे टप्पे
- सर्वप्रथम प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइट mudra.org.in वरून कर्ज अर्ज फॉर्म डाउनलोड करा.
- शिशु कर्जाचा फॉर्म वेगळा आहे, तर तरुण आणि किशोर कर्जाचा फॉर्म एकच आहे.
- कर्ज अर्ज फॉर्ममधील सर्व माहिती भरा.
- योग्य मोबाईल नंबर, आधार क्रमांक, नाव, पत्ता इत्यादी द्या.
- तुम्हाला तुमचा व्यवसाय कुठे सुरू करायचा आहे याची माहिती द्या.
- ओबीसी, एससी-एसटी प्रवर्गात येणाऱ्या अर्जदारांना जात प्रमाणपत्र द्यावे लागेल.
- २ पासपोर्ट आकाराचे फोटो जोडा.
- फॉर्म भरल्यानंतर, कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी बँकेत जा आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करा.
- सर्व कागदपत्रे सादर करा.
- बँकेचा शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून कामाबद्दल माहिती घेतो. त्या आधारावर PMMY तुम्हाला कर्ज मंजूर करते.
आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र
- निवास पुरावा
- यंत्रसामग्री इत्यादींची माहिती.
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- व्यवसाय प्रमाणपत्र
- व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा
कर्जाची परतफेड कशी करावी?
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे व्याजदर वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळे असू शकतात. मुद्रा कर्जासाठी वेगवेगळ्या बँका वेगवेगळे व्याजदर आकारू शकतात. कर्ज घेणाऱ्याच्या व्यवसायाचे स्वरूप आणि त्याच्याशी संबंधित जोखीम यावर देखील व्याजदर अवलंबून असतो. साधारणपणे किमान व्याजदर 12 टक्के असतो.
स्टँड-अप इंडिया योजना
2016 मध्ये सुरू झालेली ही योजना अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला उद्योजकांसाठी आहे. यामध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी 10 लाखांपासून 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज मिळू शकतं.
विशेष म्हणजे, योजनेच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये व्याज आकारलं जात नाही. यामुळे महिला आणि मागासवर्गीयांना व्यवसाय उभा करण्यासाठी चांगली संधी मिळते.
महिला स्व-सहायता गटांसाठी योजना
देशातील विविध राज्य सरकारांकडून महिलांच्या स्व-सहायता गटांना शून्य व्याज किंवा अत्यल्प व्याजदराने कर्ज दिलं जातं. तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडु या राज्यांमध्ये 'DWACRA योजना', 'महिला उद्यमी कर्ज योजना' अंतर्गत घरगुती उद्योग किंवा लघुउद्योगासाठी महिलांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. यामुळे महिलांचे आर्थिक सशक्तीकरण होते.
किसान क्रेडिट कार्ड योजना (KCC)
शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. यात शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी 5 लाखांपर्यंतचं कर्ज दिलं जातं. या कर्जावर सरकारकडून 2 ते 4 टक्के व्याज अनुदान दिलं जातं. जर कर्ज वेळेत परतफेड केलं, तर काही प्रकरणांमध्ये शून्य टक्के व्याजदर लागू होतो.
कोणती कागदपत्रे आवश्यक असतील?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खाली नमूद केलेल्या कागदपत्रांची आवश्यकता असू शकते-
मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड आवश्यक असेल. ओळखपत्र आणि पत्ता पुराव्यासाठी ही कागदपत्रे तुमच्याकडून मागितली जाऊ शकतात.
योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
जर तुम्हाला KCC (किसान क्रेडिट कार्ड) साठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला खाली दिलेल्या पायऱ्या फॉलो कराव्या लागतील.
स्टेप १- सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
स्टेप २- येथे तुम्हाला किसान क्रेडिट कार्डशी संबंधित फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
स्टेप ३- आता या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती आणि कागदपत्रे सबमिट करा.
स्टेप ४- यानंतर, फॉर्ममध्ये भरलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर, ते सबमिट करा. पडताळणीनंतर काही दिवसांत तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळेल. अशा प्रकारे तुम्ही योजनेसाठी सहजपणे अर्ज करू शकता.












Click it and Unblock the Notifications