ऐन सणासुदीत TV, AC आणि फ्रिज झाले स्वस्त! GST कपातीमुळे महाबचत, कोणती वस्तू किती रुपयांना? वाचा यादी
Diwali shopping gst rate cuts electronics appliances tv ac fridge cheaper prices : नवरात्री, दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जीएसटी दरात मोठी कपात झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांवरे आणि अनेक वस्तू आता कमी किमतीत उपलब्ध झाल्या आहेत. २२ सप्टेंबर, २०२५ पासून हा निर्णय लागू झाला असून, टीव्ही, एसी, फ्रिज, डिशवॉशर अशा अनेक महत्त्वाच्या वस्तूंवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत खाली आला आहे. यामुळे सणासुदीच्या खरेदीसाठी तयार असलेल्या ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे.

टीव्ही खरेदीवर मोठी बचत: ८५,००० रुपयांपर्यंत किंमत कमी
जर तुम्ही दिवाळीत नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. ३२ इंचांपेक्षा मोठ्या टीव्हीवरील जीएसटी २८% वरून १८% झाल्याने, आघाडीच्या कंपन्यांनी त्यांच्या मॉडेल्सच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत.
सोनी ब्राव्हिया (Sony Bravia)
त्यांच्या मॉडेल्सवर ५,००० ते ७१,००० रुपयांपर्यंत किंमत घटली आहे. उदा. ४३ इंचांचा ब्राव्हिया २ टीव्ही आता फक्त ५४,९०० रुपयांना उपलब्ध आहे.
एलजी (LG)
एलजीने ४३ ते १०० इंचांच्या टीव्हीवर २५०० ते ८५,८०० रुपयांपर्यंत सूट जाहीर केली आहे. ५५ इंचांचा लोकप्रिय टीव्ही आता फक्त ४२,९९० रुपयांना मिळत आहे.
पॅनासोनिक (Panasonic)
पॅनासोनिकने ३,००० ते ३२,००० रुपयांपर्यंत किमती कमी केल्या आहेत.
एसी खरेदीवर ४,३०० रुपयांपर्यंतची बचत
उन्हाळ्याची तयारी आतापासूनच सुरू करा! एसीवरील जीएसटी १८% झाल्यामुळे एसी खरेदी करणे आता अधिक सोपे झाले आहे.
व्होल्टास (Voltas)
१.५ टन एसी आता ४३,००० ऐवजी ३९,६०० रुपयांना मिळत आहे.
एलजी (LG)
५ स्टार इन्व्हर्टर एसीवर ४,१०० रुपयांची बचत होणार आहे.
सॅमसंग (Samsung)
१ टन एसीवर २,७०० रुपयांची बचत होणार आहे.
ब्लू स्टार (Blue Star)
१.५ टन एसीवर तब्बल ४,३०० रुपयांची बचत मिळणार आहे.
रिलायन्स डिजिटलच्या म्हणण्यानुसार, आधी ४०,००० रुपयांच्या एसीवर सुमारे ८,७५० रुपये जीएसटी लागत होता, पण आता तो ५,६२५ रुपये झाला आहे. म्हणजेच, तुम्ही एका एसीवर ३,१२५ रुपये वाचवू शकता!
फ्रिज आणि डिशवॉशरही झाले स्वस्त!
फ्रिजच्या किमती किती?
गोदरेजने फ्रिजच्या किमती ७-८% नी कमी केल्या आहेत, तर एलजीचे फ्रिज ८-९% नी स्वस्त झाले आहेत.
डिशवॉशरच्या किमती किती?
डिशवॉशरवरील जीएसटी १८% झाल्याने, बीएसएच होम अप्लायन्सेसने ८,००० रुपयांपर्यंतची सूट दिली आहे. प्रीमियम मॉडेलची किंमत आता १,०४,५०० वरून ९६,५०० झाली आहे.
या जीएसटी कपातीमुळे ग्राहकांना सणासुदीच्या काळात चांगली खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे तुम्हीही तुमच्या गरजेनुसार या वस्तूंची खरेदी करून मोठी बचत करू शकता. खरेदी करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइट्स आणि दुकानांमध्ये किमतीची खात्री करून घ्या.
हेही वाचा : Gst reform Today : नवरात्रीचा धमाका! आजपासून जीएसटी बदल, 'या' वस्तू झाल्या स्वस्त! जाणून घ्या












Click it and Unblock the Notifications