Gst reform Today : नवरात्रीचा धमाका! आजपासून जीएसटी बदल, 'या' वस्तू झाल्या स्वस्त! जाणून घ्या
Gst reform Today major tax cuts on daily essentials cars bikes in india : ३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या ५६ व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, जीएसटी स्लॅबची संख्या कमी करून फक्त दोन मुख्य स्लॅब ठेवण्यात आले तर एक स्लॅब जो की, खूपच महत्वाचा नाही तो ४० टक्के जीएसटी आकरण्यासंदर्भात ठेवला गेला. सामान्य नागरिकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले.
"या बदलांमुळे सामान्य नागरिकांचे जीवनमान सुलभ होईल अशी शक्यता आहे. अनेक वस्तूंवरील जीएसटी दर आजपासून कमी झाले आहेत. याचा थेट फायदा मध्यमवर्गीय, शेतकरी आणि कामगार वर्गाला होणार आहे.

१. आजपासून काय स्वस्त झाले?
सिमेंट आणि घर बांधणीचा खर्च १०% ने कमी झाला, टीव्ही, एसी आणि ५० इंचाचे टीव्ही आता सवलतीत स्वस्त, ३३ आवश्यक औषधे करमुक्त, लहान कार/३५० सीसी, बाईक, ऑटो पार्ट्स/तीन चाकी वाहने महत्वाचे खाद्यपदार्थही स्वस्त झाले आहे.
२. जीएसटी शून्य (०%)
या बदलांमध्ये सर्वात मोठा दिलासा म्हणजे काही मूलभूत खाद्यपदार्थांवरचा जीएसटी पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. यामुळे, अति-उच्च तापमानाचे दूध, छेना आणि पनीर यांसारख्या पदार्थांवर आता कोणताही कर लागणार नाही. याशिवाय, सर्व प्रकारच्या भारतीय ब्रेडवर (रोटी, पराठे इत्यादी) आता शून्य जीएसटी लागू होईल. यामुळे सकाळच्या न्याहारीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत अनेक पदार्थांवरील खर्च कमी होईल.
३. घरगुती वापराच्या वस्तू स्वस्त
पूर्वी जास्त जीएसटी असलेल्या अनेक घरगुती वस्तू आता केवळ ५% जीएसटीच्या कक्षेत आल्या आहेत. यामध्ये केसांचे तेल, टॉयलेट साबण, शॅम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट यांचा समावेश आहे. यासोबतच, सायकल, टेबलवेअर आणि स्वयंपाकघरातील भांडीही स्वस्त होणार आहेत.
४. खाद्यपदार्थ स्वस्त
या बदलामुळे नमकीन, भुजिया, सॉस, पास्ता, पनीर, तुप, लोणी, इन्स्टंट नूडल्स, चॉकलेट, कॉफी, बटर आणि तूप यांसारखे पदार्थही आता ५% जीएसटीच्या कक्षेत आले आहेत.
५. कार, बाईक स्वस्त
पूर्वी २८% जीएसटी असलेल्या अनेक वस्तूंवर आता १८% पर्यंत मोठी कपात झाली आहे. यात एअर कंडिशनिंग मशीन्स, ३२ इंचापेक्षा मोठ्या आकाराचे टीव्ही, डिशवॉशिंग मशीन्स, आणि विशेषतः लहान कार व ३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या मोटारसायकली यांचा समावेश आहे. हा निर्णय नवीन कार किंवा बाईक खरेदी करण्याची योजना असलेल्या लोकांसाठी एक मोठी संधी आहे.












Click it and Unblock the Notifications