December 2024 Bank Holiday : ख्रिसमस व्यतिरिक्त, डिसेंबरमध्ये 'या' दिवसात बँका बंद राहतील, वाचा यादी
December 2024 Bank Holiday List : बँक सुट्ट्यांची यादीची प्रत्येकजण दर महिन्याला वाट पाहतात. कारण या दिवशी बँकेला सुटी असते आणि तो दिवस वगळून बँक व्यवहार करणे क्रमप्राप्त ठरते त्यामुळे बँकेला सुट्ट्या कधी आहेत हे आधी तपासले जाते.
जरी बँकिंग सेवा ऑनलाइन मोडमध्ये आली असली तरी, अजूनही अनेक कामे आहेत जी बँकेत गेल्याशिवाय करता येत नाहीत. अशा परिस्थितीत बँकांच्या सुट्ट्यांची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. नाहीतर ऐनवेळी आपले काम खराब होऊ शकते. म्हणूनच आरबीआयने जाहीर केलेली वर्षातील प्रत्येक महिन्याची बँक सुट्टीची यादी महत्त्वाची ठरते.

खासकरुन व्यापारी वर्गाची अशी अनेक कामे असतात जी बँकेत गेल्यावरच होतात, त्यातल्या त्यात पीकविमा आणि शेतकरी वर्गांशी संबंधित कामे बँक बंद असली की, खोळंबतात त्यामुळे डिसेंबरमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद राहतील हे महत्वाचे आहे.
डिसेंबर महिन्यात बँकेच्या सुट्ट्या कधी आहेत
- 3 डिसेंबर - सेंट फ्रान्सिस झेवियर उत्सवानिमित्त गोव्यातील बँका बंद राहणार आहेत.
- 12 डिसेंबर - पा-जोगन नेंगमिंजा संगमा निमित्त शिलाँग भागातील बँका बंद राहतील.
- 18 डिसेंबर - शिलाँग भागातील बँका यू सो थामच्या पुण्यतिथीनिमित्त बंद राहतील.
- 19 डिसेंबर - गोवा मुक्ती दिनानिमित्त बँका बंद राहतील.
- 24 डिसेंबर - नाताळच्या पूर्वसंध्येला आयझॉल, कोहिमा, शिलाँग भागातील बँका बंद राहतील.
- 25 डिसेंबरपर्यंत - ख्रिसमसच्या निमित्ताने देशभरातील बँका बंद राहतील.
- 26 आणि 27 डिसेंबर - ख्रिसमसचे सण सुरू राहिल्यामुळे आयझॉल, कोहिमा आणि बँकांना सुट्टी असेल.
- 26 रोजी शिलाँग. 27 डिसेंबर रोजी कोहिमा भागातील बँकांना सुट्टी असेल.
- 30 डिसेंबर - शिलॉन्गमधील बँका U Kiang Nongbah च्या निमित्ताने बंद राहतील.
- 31 डिसेंबर - गंगटोक आणि आयझॉल भागात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, लोसोंग आणि नामसंगच्या निमित्ताने बँकेला सुट्टी असेल.
टीप: ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या गृहीतकांवर आणि माहितीवर आधारित आहे. oneindia लेखाशी संबंधित कोणतेही इनपुट किंवा माहिती सत्यापित करत नाही. कृपया कोणतीही माहिती आणि गृहितके अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.












Click it and Unblock the Notifications