DA Hike : दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार! पगारात किती वाढ होणार? समजून घ्या

DA hike govt employees will increase Dearness allowance before Diwali : केंद्र सरकारने दिवाळी गोड करण्याचा सपाटाच लावला असून आधी जीएसटी कपात आणि स्लॅबमध्ये बदल केल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक आनंदाची बातमी देणार आहे. दसरा आणि दिवाळीसारख्या सणांच्या काळातच सरकार महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याची घोषणा करण्याची जास्त शक्यता आहे.

DA Hike

१.२ कोटी केंद्रीय कामगारांना मोठा दिलासा

केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करणार आहे असे मिडिया रिपोर्ट्स सांगतात, गुड रिटर्न्सनुसार, केंद्र सरकार तीन ते चार टक्के महागाई भत्ता वाढवणार आहे. जर ही घोषणा झाली तर या निर्णयामुळे सुमारे १.२ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महागाई भत्ता किती वाढणार?

गुड रिटर्न्सनुसार, या वेळी महागाई भत्त्यात ३% ते ४% वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सध्याचा ५५% महागाई भत्ता वाढून ५८% पर्यंत पोहोचू शकतो. ही वाढ जुलै २०२५ पासून लागू होईल. महागाई भत्त्यातील वाढ वर्षातून दोनदा जाहीर केली जाते.

  • पहिल्या तिमाहीत जानेवारी ते जून या कालावधीसाठीची वाढ मार्चमध्ये जाहीर होते.
  • दुसऱ्या तिमाहीत जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठीची वाढ सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जाहीर होते.

पगारात किती वाढ होणार? समजून घ्या गणित

३% महागाई भत्ता वाढीमुळे पगारात होणारी वाढ समजून घेऊया.

  • मूळ पगार ₹१८,०००
  • ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ₹१८,००० आहे, त्यांच्या पगारात दरमहा ₹५४० (१८,००० चा ३%) वाढ होईल. ही वाढ १ जुलै, २०२५ पासून लागू होईल.
  • एकूण पगार ₹३०,००० असून समजा मूळ पगार ₹१८,००० आहे.
  • सध्या, ५३% महागाई भत्त्यानुसार त्यांना ₹९,५४० (१८,००० चा ५३%) मिळतो.
  • ३% वाढीनंतर, महागाई भत्ता ५६% होईल.
  • नवीन महागाई भत्ता: ₹१०,०८० (१८,००० चा ५६%)
  • म्हणजे, पगारात ₹५४० (१०,०८० - ९,५४० = ५४०) ची वाढ होईल.

ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी महागाईचा सामना करण्यास मदत करेल आणि सणांच्या काळात त्यांना आर्थिक मदत देईल अशी आशा आहे, सध्या कर्मचारी या वाढीची वाट पाहत आहेत.

हेही वाचा : Gold Rate: आज चंद्रग्रहण, सोने आणि चांदीचे दर काय असतील? एका आठवड्यात सोने-चांदी किती महागले?

हेही वाचा : GST Reform जीएसटी बदलानंतर स्वस्त वस्तूंचीच चर्चा; पण हा फटका! कोणत्या गोष्टी महाग होणार? जाणून घ्या

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+