Amul Franchise Business: अमूलसोबत होईल मोठी कमाई! असा सुरु करा बिझनेस , या स्टेप फॉलो करा
Business With Amul Step By Step Process: व्यवसाय सुरु करायचा आहे. पण काय व्यवसाय सुरु करावा या बद्दल पुरेशी माहिती नसते. त्यामुळे अनेकवेळा आपला गोंधळ उडतो. तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्हाला अमूलसोबत व्यवसाय करण्याची संधी आहे, याबद्दल आम्ही तुम्हाला काही माहिती सांगणार आहोत.
आजकाल बहुतेक लोक अमूल सोबत व्यवसाय सुरू करत आहेत. कारण भारतातील बहुतेक लोक त्यांच्या सकाळची सुरुवात चहाने करतात. अशा परिस्थितीत दुधाची विक्री सर्वाधिक होते. अमूल दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी फ्रेंचाइजी देते. म्हणजेच तुम्हाला अमूल दुग्धजन्य पदार्थ विकण्याची परवानगी मिळते. तुम्ही हा व्यवसाय कसा सुरू करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

व्यवसाय सुरू करण्यासाठी एवढी जागा हवी
व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे मौक्याच्या ठिकाणी जागा हवी. जर तुम्ही अमूल आउटलेट सुरू करत असाल तर 150 चौरस फूट जागा असावी. आईस्क्रीम पार्लरसाठी किमान जागा 300 चौरस फूट जागा असावी. अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर आणि अमूल किओस्कमध्ये कोणत्याही एका फ्रँचायझीसह तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायांनुसार दुकानाच्या आकाराचे नियमही बदलतात. न्यूज 18 च्या वृत्तानुसार या तिन्ही आउटलेटसाठी दुकानाचा आकार 100-150 स्क्वेअर फूट असावा.
या स्टेप करा फॉलो
- हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला पात्रता निकष पूर्ण करावे लागतील. तुमची किमान मालमत्ता 25 लाख रुपये आणि गुंतवणूक 5-10 लाख रुपये असावी.
- हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अर्ज भरावा लागेल, जो तुम्हाला अमूलच्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल. यानंतर अमूल तुमच्या रिटेल स्टोअरच्या ठिकाणाची तपासणी करेल.
- त्यानंतर फ्रँचायझी करारावरील सर्व अटी व शर्ती वाचल्यानंतर तुम्हाला त्यावर स्वाक्षरी करावी लागेल.
दर महिन्याला होईल मोठी कमाई
अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लर उघडण्यासाठी 6 लाख रुपये खर्च येतो. यामध्ये 50,000 रुपये डिपॉझिट ठेव. 4 लाख रुपये रेनोवेशन आणि 1.5 लाख रुपये मशिनरीचा समावेश आहे. जर तुम्ही अमूलचे आउटलेट बाजारातील एखाद्या प्राइम लोकेशनवर उघडले तर तुमचे मासिक उत्पन्न 2 ते 3 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते.












Click it and Unblock the Notifications