Budget 2026 : अर्थसंकल्पाचा सामान्यांना दिलासा की झळ? पाहा 'काय स्वस्त आणि काय महाग'ची संपूर्ण यादी!
Budget 2026 Swasth Kay ani Mahag kai zale : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १ फेब्रुवारी २०२६ रोजी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. सलग नवव्यांदा बजेट मांडत त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 'युवाशक्ती' आणि 'कर्तव्य' यावर आधारित असलेल्या या बजेटचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. स्वयंपाकघरापासून ते रुग्णालयातील उपचारांपर्यंत कोणत्या गोष्टींचे दर बदलले आहेत, याचा संपूर्ण हिशोब खालीलप्रमाणे आहे.

१. रुग्णांना मोठा दिलासा: औषधे होणार स्वस्त
- या बजेटमधील सर्वात मोठा दिलासा आरोग्य क्षेत्रासाठी मिळाला आहे.
- कॅन्सर आणि शुगर: कॅन्सर (कर्कर्ोग) आणि मधुमेहाच्या तब्बल १७ महत्त्वाच्या औषधांवरील ड्युटी कमी करण्यात आली आहे.
- दुर्लभ आजार: ७ दुर्मिळ आजारांवरील औषधे आता स्वस्त दरात उपलब्ध होतील.
२. गॅझेट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रेमींसाठी आनंदाची बातमी
- मोबाईल आणि बॅटरी: लिथियम आयन सेल आणि मोबाईल बॅटरींवरील सीमा शुल्कात कपात केल्यामुळे स्मार्टफोन्स स्वस्त होणार आहेत.
- इलेक्ट्रिक वाहने (EV): ईव्ही बॅटरी स्वस्त झाल्यामुळे पर्यावरणापूरक गाड्यांच्या किमती कमी होतील.
- सोलर ग्लास: सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सोलर ग्लास स्वस्त करण्यात आले आहेत.
३. फॅशन आणि घरगुती उपकरणे
- स्वस्त होणार: कापड (Clothes), लेदर आयटम्स, सिंथेटिक फुटवेअर (पादत्राणे) आणि चामड्याचे उत्पादन स्वस्त होईल.
- घरगुती उपकरणे: मायक्रोवेव्ह ओव्हनच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे.
४. काय महाग झाले? (खिशाला लागणार कात्री)
- काही गोष्टींवरील कर किंवा शुल्कात वाढ झाल्यामुळे त्या महागणार आहेत.
- व्यसने महागली: बीड़ी आणि अल्कोहोल (मद्य) महाग होणार आहे.
- प्रवास: परदेश प्रवास (Foreign Travel) अधिक महाग होऊ शकतो.
इतर: काही विशिष्ट खनिजे, स्क्रॅप आणि 'फ्यूचर अँड ऑप्शन' (F&O) ट्रेडिंगवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
काय स्वस्त झाले? (Cheaper)
- मोबाईल फोन
- मोबाईल बॅटरी
- लिथियम आयन सेल (EV बॅटरी)
- कॅन्सरची औषधे (१७ प्रकारची)
- मधुमेहाची औषधे
- ७ दुर्मिळ आजारांवरील औषधे
- लेदर शूज आणि चप्पल (पादत्राणे)
- सिंथेटिक फुटवेअर
- चामड्याचे इतर उत्पादने
- सोलर पॅनेलचे ग्लास
- मायक्रोवेव्ह ओव्हन
- कापड (Clothes)
काय महाग झाले? (Costlier)
- दारू (Alcohol)
- परदेश प्रवास (Foreign Travel)
- बीड़ी
- विशिष्ट खनिजे (Minerals)
- मेटल स्क्रॅप
- फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग (F&O)
- विदेशी कंपन्यांकडून आयात केल्या जाणाऱ्या काही चैनीच्या वस्तू
हेही वाचा : Union Budget 2026 : 'विकसित भारत'साठी 4 पॉवर इंजिन्स; मध्यमवर्गीय, शेतकरी, तरुणांसाठी घोषणांचा पाऊस!












Click it and Unblock the Notifications