Bank Holiday: या आठवड्यात बँका 'इतक्या' दिवस बंद राहणार! महालक्ष्मी सणाला सुट्टी असेल का? जाणून घ्या
Banks closed for 4 days in August's last week : राज्यात गणेशाच्या आगमनाची चाहूल लागली असून कोकणवासीयांच्या गौरी-गणपती सणासाठी कोकणात जाण्यासाठी रांगा लागल्या आहेत. त्यामुळे सुट्ट्यांचा हा काळ असून देशात या आठवड्यात चार दिवस दिवस बँका बंद राहणार आहेत. तर महाराष्ट्रातही सर्व बँका दोन दिवस बंद राहतील.
ऐन सणाच्या धामधुमीत आता सुट्ट्यांची गरज आहे आणि त्यासाठी अनेक अर्ज आपापल्या आस्थापनांकडे नोकरदार करत आहेत. गौरी-गणपतीचा सण महत्वाचा असून यासाठी कुटुंब एकत्र हवं असा महाराष्ट्रात अलिखित नियम असतो. या काळात महाराष्ट्रात दोन दिवस नोकरदार आणि बँकांना सुट्या आहेत.

कधी आहे महाराष्ट्रात सुट्ट्या?
27 ऑगस्ट - महाराष्ट्रात 27 ऑगस्ट रोजी गणपती बप्पांचे आगमन होत आहे, या दिवशी राज्यात सर्व शाळा, सरकारी आस्थापना आणि बँकांना सुट्टी असते. ही सरकारी सुट्टी असल्याने या दिवशी बँका बंद राहतील.
31 ऑगस्ट - या दिवशी रविवार असल्याने हक्काची साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे शाळा, सरकारी आस्थापनांसह बँकांही बंद राहणार आहेत.
उर्वरित दोन दिवस या राज्यात सुट्टी
25 ऑगस्ट - म्हणजेच आज आसाम राज्यातील गवाहटीत बँका बंद राहतील तेथे आरबीआयने या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. मात्र देशात इतर ठिकाणी बँका चालूच राहतील.
28 ऑगस्ट - या दिवशी म्हणजेच गुरुवारी भुवनेश्वर आणि पणजी शहरात बँका बंद राहणार आहेत. पणजी आणि भुवनेश्वर वगळता अन्य ठिकाणी बँका सुरुच राहतील.
गौरी- महालक्ष्मी सणासाठी सुट्टी असेल का?
दरवर्षी गणेशउत्सवात येणारा गौरी-महालक्ष्मीचा सण यंदा 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या काळात आहे. यंदा 31 ऑगस्ट रोजी गौरी आवाहन, 1 सप्टेंबर रोजी गौरी पुजन आणि 2 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे. या दिवशी सोमवार, मंगळवार आणि बुधवार येत आहे, त्यामुळे या दिवशी कोणतीही साप्ताहिक सुट्टी नाही.
महाराष्ट्रात 27 ऑगस्टला गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे आणि प्रत्येक गणेशउत्सवाला सुट्टी असते गौरी - महालक्ष्मी सणाला नसते त्यामुळे गौरी महालक्ष्मी सणांच्या दिवशी कोणतीही सरकारकडून घोषित सुट्टी नाही.
हेही वाचा : Ganeshotsav 2025 : गणेशउत्सवासाठी घरी मातीपासून असा बनवा गणपती, 'या' 7 सोप्या टीप्स जाणून घ्या
हेही वाचा : Ganesh chaturthi 2025 wishes messages : गणेश चतुर्थीसाठी खास संदेश शुभेच्छा अन् स्टेटस! तुमच्यासाठी
हेही वाचा : Ganesh Chaturthi 2025 Date: गणपती बप्पांचं आगमन कधी होणार? जाणून घ्या तारीख प्रतिष्ठापना शुभ मुहूर्त












Click it and Unblock the Notifications