अदानी समूहाची Hum Karke Dikhate Hain मालिकेतील तिसरी फिल्म ‘Story of Suraj' प्रदर्शित
भारताचा सर्वात मोठा आणि वेगाने वाढणारा एकात्मिक पायाभूत सुविधा समूह असलेल्या अदानी ग्रुपने 'Story of Suraj' ही तिसरी प्रेरणादायक फिल्म प्रदर्शित केली आहे. ही फिल्म #HumKarkeDikhateHain या प्रशंसनीय मालिकेचा भाग आहे, जी भारतातील सौरऊर्जेच्या सक्रीय परिणामांवर प्रकाश टाकते आणि नव्या शक्यता घडवून आणणाऱ्या नवीकरणीय ऊर्जेच्या परिणामांची जिवंत झलक देते.

ऊर्जा, वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि समाज विकास या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेला अदानी समूह, स्वच्छ ऊर्जेत गुंतवणूक करून आणि समावेशक व सक्षम भविष्य घडवण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. ही उपक्रम फक्त प्रमाणात मोठी नसतात, तर त्यांच्या प्रभावामुळे समुदायांचे जीवनमान उंचावले जात आहे.
'Story of Suraj' ही फिल्म अशा एका गावात घडते, जे आता अखंडित सौरऊर्जेच्या प्रकाशात उजळून निघाले आहे. यामध्ये दाखवले आहे की अदानीच्या स्वच्छ ऊर्जा उपाययोजनांमुळे त्या गावात कशी क्रांती झाली-शेती फुलली, शाळा डिजिटल झाल्या, रुग्णालये सक्षम झाली आणि लोकांचे उपजीविकेचे साधन नव्याने बहरले. या कथेत 'राकेश' नावाचा तरुण, अनेक वर्षांनी आपल्या गावात परततो आणि तिथे सौरऊर्जेमुळे झालेला अमूलाग्र बदल पाहतो.
या चित्रपटाचे दिग्दर्शन 'बधाई हो' या हिट चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक अमित शर्मा यांनी केले आहे. क्रोम पिक्चर्सने हे फिल्म तयार केले असून त्याची संकल्पना ओगिल्वी इंडियाने मांडली आहे. चित्रपटात अदानीच्या स्वच्छ ऊर्जा मोहिमेचा मानवी पैलू प्रभावीपणे उभा केला आहे. यात दाखवले आहे की सौरऊर्जा केवळ विजेपुरती मर्यादित नाही, तर ती एक संधी, आत्मनिर्भरता आणि प्रगतीचे साधन बनते.
Adani Green Energy Limited (AGEL) ही जगातील आघाडीची नवीकरणीय ऊर्जा उत्पादक कंपन्यांपैकी एक असून, भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाच्या अग्रभागी आहे. AGEL च्या सौर आणि पवनऊर्जा प्रकल्पांचे विशाल जाळे भारतभर कार्यरत आहे. हे प्रकल्प युटिलिटी-स्केल, ग्रीडशी जोडलेले असून, भारताला हरित आणि शाश्वत भविष्यात पुढे नेत आहेत.
अदानी ग्रुपचे कॉर्पोरेट ब्रँडिंग प्रमुख श्री. अजय काकर यांनी सांगितले, "अदानीमध्ये आम्ही केवळ वीज निर्माण करत नाही, तर प्रगतीचे मार्ग निर्माण करतो. ही फिल्म सौरऊर्जेचा दैनंदिन जीवनावर होणारा खरा परिणाम दर्शवते. एका गावाचा झालेला परिवर्तन हा आम्ही संपूर्ण भारतभर घडवत असलेल्या बदलांचा प्रतीक आहे."
ओगिल्वी इंडियाचे चीफ अॅडव्हायझर श्री. पियुष पांडे म्हणाले, "अदानीने आपल्या नवीन सौरऊर्जा फिल्मद्वारे तंत्रज्ञानाला मानवी स्पर्श दिला आहे. 'Story of Suraj' ही फिल्म दाखवते की सौरऊर्जेने समुदायांमध्ये कसे जीवन बदलणारे संधी निर्माण केल्या आहेत आणि त्यांचे भविष्य उजळवले आहे."
ही फिल्म #AdaniHKKDH मालिकेतील नवीन अध्याय असून, अदानी ग्रुप भारतभर जीवनात बदल घडवतो आहे, समुदायांना सबल करत आहे आणि दीर्घकालीन सकारात्मक परिणाम निर्माण करत आहे, हे दाखवते. ही फिल्म टीव्ही, डिजिटल मीडियावर तसेच रेडिओद्वारे प्रसारित केली जाणार असून, व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाईल.












Click it and Unblock the Notifications