अदानी पोर्ट्सकडून हजीरा बंदरात जगातील पहिली स्टील स्लॅग रस्त्याची उभारणी
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) ने हजीरा बंदरात जगातील पहिला स्टील स्लॅग रस्ता साकारत वास्तविक औद्योगिक कचऱ्याचा शाश्वत पायाभूत सुविधांमध्ये पुनर्वापर करत एक नवा जागतिक आदर्श निर्माण केला आहे.

हा 1.1 किलोमीटर लांबीचा रस्ता हजीरा बंदरातील मल्टी-पर्पज बर्थ (MPB-1) पासून कोळसा साठवण यार्डपर्यंत जातो. या रस्त्यासाठी स्टील उद्योगातून निर्माण होणाऱ्या स्लॅगचा (उपउत्पादनाचा) प्रक्रियायुक्त उपयोग करण्यात आला आहे. यामुळे हा प्रकल्प केवळ पर्यावरणपूरक ठरला नसून, उच्च टिकाऊपणा आणि कार्यक्षमतेचा नमुना बनला आहे.
'वेस्ट टू वेल्थ' मिशनशी सुसंगत
या प्रकल्पाची उभारणी बुल्क व जनरल कार्गो टर्मिनल (BGCT) च्या दुसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून झाली असून, यासाठी CSIR-Central Road Research Institute (CRRI) आणि भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने हा उपक्रम साकारण्यात आला. CSIR-CRRI ने तयार केलेल्या लवचिक रस्त्याच्या रचनेमुळे भारवाहक क्षमता वाढते, टिकाऊपणा मिळतो आणि बांधकामाचा खर्च कमी होतो, शिवाय पर्यावरणावर होणारा परिणामही लक्षणीयरीत्या घटतो.
उद्घाटन सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती
हा रस्ता NITI आयोगाचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सदस्य डॉ. विजय कुमार सरस्वत यांच्या हस्ते औपचारिकपणे उद्घाटीत करण्यात आला. यावेळी CSIR आणि DSIRच्या महासंचालिका डॉ. एन. कलाईसेल्वी, CSIR-CRRIचे संचालक आणि इंडियन रोड्स काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. मनोरंजन परिडा, स्टील स्लॅग रस्ता तंत्रज्ञानाचे शोधकर्ते डॉ. सतीश पांडे, अदानी हजीरा पोर्टचे सीओओ आनंद माराठे आणि इतर वैज्ञानिक व मान्यवर उपस्थित होते.
देशातील तिसरा, मात्र बंदरातला पहिलाच स्टील स्लॅग रस्ता
भारतामध्ये हा तिसरा स्टील स्लॅग रस्ता असला तरी, जगातील कोणत्याही खासगी बंदरात उभारलेला पहिलाच रस्ता आहे. त्यामुळे भारत आणि अदानी पोर्ट्स यांनी समुद्री पायाभूत विकासाच्या पर्यावरणपूरक दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
अदानी पोर्ट्सकडून लॉजिस्टिक्स क्षेत्रात शाश्वत परिवर्तन
या उपक्रमामुळे अदानी पोर्ट्स भारताच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या परिवर्तनात आघाडीवर राहते, जिथे औद्योगिक परिसंस्था, नवोन्मेष, आणि पर्यावरणीय जाणीवेची सांगड घालून राष्ट्रीय प्रगतीसाठी एक शाश्वत पायाभूत धोरण उभे करण्यात येत आहे.
हा रस्ता केवळ भौतिक संपर्काचा मार्ग नसून, तो 'कचऱ्यातून संपत्ती' निर्माण करण्याच्या राष्ट्रीय ध्येयाचा एक भक्कम दुवा आहे.












Click it and Unblock the Notifications