8 वा वेतन आयोग मंजूर; पण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कधी अन् किती होणार वाढ? जाणून घ्या गणित
8th pay commission approved salary hike implementation date : देशातील १० दशलक्षाहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे! केंद्र सरकारने अखेर ८ व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) स्थापनेला औपचारिकपणे मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सुमारे ५० लाख सेवारत कर्मचाऱ्यांच्या आणि ६९ लाख पेन्शनधारकांच्या वेतन व पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. वेतन आयोग कधीपासून लागू होणार आणि तुमच्या पगारात नेमकी किती वाढ अपेक्षित आहे, याबद्दलचे ताजे अपडेट्स खालील बातमीत वाचा.

८ वा वेतन आयोग - पगारवाढ आणि अंमलबजावणीचे वेळापत्रक
केंद्र सरकारने ८ व्या वेतन आयोगाला हिरवा कंदील दाखवला असून, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. गुडरिटर्ननुसार, वेतन आयोगाची स्थापना ८ वा वेतन आयोग एप्रिल २०२५ पर्यंत स्थापन होण्याची अपेक्षा आहे. हा आयोग पुढील १८ महिन्यांच्या आत सरकारला आपल्या शिफारसी सादर करेल.
वेतन आय़ोगाची अंमलबजावणी कधी?
वेतन आयोगाला मंजुरी मिळाली असली तरीही वेतन आय़ोगाची अंमलबजावणी कधी? हा प्रश्न केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आहे. आयोगाच्या शिफारसी २०२७ पासून लागू केल्या जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ होईल अशे सांगण्यात येत आहे.
पगारात नेमकी किती वाढ? (नवीन अंदाज)
८ व्या वेतन आयोगाने अद्याप अधिकृत वेतन श्रेणी जाहीर केलेली नाही. परंतु, संभाव्य २.८६ फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर पगारवाढीचे अंदाज व्यक्त केले जात आहेत.
| वेतन स्तर | जुने बेसिक वेतन नवीन | अपेक्षित बेसिक वेतन |
| लेवल १ (कनिष्ठ कर्मचारी) | १८,००० रुपये | २१,६०० रुपये |
| लेवल १८ (वरिष्ठ अधिकारी) | २.५ लाख रुपये | ३ लाख रुपये |
८ व्या वेतन आयोगामुळे पगारात होणारी अंदाजित वाढ (बजेट वाटपानुसार):
बजेट वाटप: रु. १.७५ लाख कोटी झाल्यास पगारात १४ टक्के वाढ अपेक्षित आहे. सध्याचा पगार रु. १ लाख असल्यास नवा पगार १ लाख १४ हजार रुपये प्रति महीना अपेक्षित आहे.












Click it and Unblock the Notifications