8th Pay Commission: 8वा वेतन आयोग कधीपासून,कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ किती?,आली मोठी अपडेट!
8th Pay Commission Update News : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित आठवा वेतन आयोग पूर्णपणे लागू होण्यासाठी २०२८ पर्यंत वाट पाहावी लागू शकते.
जरी केंद्रीय मंत्रिमंडळाने जानेवारीमध्ये याला सैद्धांतिक मान्यता दिली असली, तरी अद्याप त्याची अधिकृत अधिसूचना जारी झालेली नाही किंवा आयोगाच्या सदस्यांची यादीही जाहीर झालेली नाही. परंतु, त्यासंदर्भातील चांगली बातमी अशी की हा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू केला जाईल, याचा अर्थ कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची थकबाकी (Arrears) मिळणार आहे.
आठव्या वेतन आयोगामुळे किती फायदा होणार?
नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे ५० लाखांहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि सुमारे ६५ लाख पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे.
मूळ वेतनात मोठी वाढ: लेव्हल १ च्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार सध्याच्या ₹१८,००० वरून थेट ₹४४,००० पर्यंत वाढू शकतो.

फिटमेंट फॅक्टर
आठवा वेतन आयोग २.४६ चा फिटमेंट फॅक्टर लागू करू शकतो, जो पगारातील वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
पगार किती वाढू शकतो?
मूळ पगारातील वाढीची रक्कम ही प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्त्याचे (DA) विलीनीकरण यावर अवलंबून असते. सातव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर २.५७ होता, तर आठव्या वेतन आयोगात तो २.४६ असू शकतो.
महागाई भत्त्याचे विलीनीकरण
प्रत्येक वेतन आयोगात, महागाई लक्षात घेऊन नवीन मूळ पगार आधीच वाढवलेला असतो. त्यामुळे, नवीन वेतन आयोगात महागाई भत्ता (DA) शून्यापासून (०%) सुरू होतो. सध्या डीए मूळ पगाराच्या ५५% आहे, जो नवीन पगारात विलीन होईल.
पगाराचे गणित
७ वा वेतन आयोग (सध्याचा पगार)
- मूलभूत वेतन (Basic Pay) ₹३५,४००
- महागाई भत्ता (DA) (५५%) ₹१९,४७०
- घरभाडे भत्ता (HRA) (२७%) ₹९,५५८\
- एकूण वेतन - ₹६४,४२८
८ वा वेतन आयोग (अंदाजित पगार, २.४६ फिटमेंट)
- मूलभूत वेतन - ₹८७,०८४ (₹३५,४०० x २.४६)
- महागाई भत्ता - ₹०% (रीसेट)
- घरभाडे भत्ता - ₹२३,५१३ (₹८७,०८४ x २७%)
- एकूण वेतन - ₹१,१०,५९७
या उदाहरणावरून स्पष्ट होते की, मूळ वेतनात मोठी वाढ होणार असल्याने एकूण वेतनात लक्षणीय वाढ होईल, जरी डीए तात्पुरता शून्य झाला तरी.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?
फिटमेंट फॅक्टर म्हणजे एक गुणक क्रमांक आहे. नवीन मूळ पगार निश्चित करण्यासाठी सध्याच्या मूळ पगाराला या फॅक्टरने गुणले जाते. महागाई आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन वेतन आयोग हा फॅक्टर निश्चित करतो.
अंमलबजावणीला २०२८ पर्यंत विलंब का?
प्रत्येक वेतन आयोगाची स्थापना झाल्यापासून त्याची पूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. हा मागील आयोगांचा इतिहास राहिलेला आहे. सातवा वेतन आयोग २०१६ मध्ये लागू झाला होता आणि वेतन आयोग दर १० वर्षांनी येतात. त्यामुळे आठव्या वेतन आयोगाची 'प्रभावी तारीख' १ जानेवारी २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे.
अहवाल तयार होण्यास आणि त्याला सरकारी मान्यता मिळण्यास वेळ लागणार असल्याने, अंमलबजावणी पूर्ण होण्यास २०२८ पर्यंतचा काळ लागू शकतो, परंतु वेतनवाढ आणि पेन्शन मात्र २०२६ च्या तारखेनुसार मोजली जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना थकबाकीचा फायदा मिळणार आहे.












Click it and Unblock the Notifications