गोकुळाष्टमीच्या उपवासात काय खावे काय खाऊ नये? जाणून घ्या
Janmashtami 2024 : गोकुळाष्टमी हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा सण आहे. जो भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. वेगवेगळ्या सणांच्या उपवासाबद्दल वेगवेगळ्या समजुती असतात. कृष्ण जन्माष्टमीच्या व्रताबद्दल लोकांमध्ये शंका आहे की जन्माष्टमीच्या उपवासात काय खावे? या दिवशी बरेच लोक उपवास करतात आणि विशेषत: विशिष्ट पदार्थांचे सेवन करतात.
जर तुम्हीही जन्माष्टमीचा उपवास करत असाल आणि जन्माष्टमीच्या उपवासात काय खावे असा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही पौष्टिक आणि चविष्ट पर्यायांबद्दल सांगत आहोत. कृष्ण जन्माष्टमी व्रता दरम्यान, आपण निरोगी आणि पौष्टिक आहार घेण्याची काळजी घ्यावी. उपवासात तुम्ही काय खाऊ शकता ते जाणून घ्या.

1. फळे आणि ड्रायफ्रुट्स
उपवासाच्या वेळी फळे खाणे हा एक चांगला पर्याय आहे. केळी, सफरचंद, द्राक्षे, पपई आणि नारळ यासारखी ताजी फळे तुम्ही खाऊ शकता. याशिवाय तुमच्या फास्टिंग फूडमध्ये बदाम, अक्रोड, काजू आणि मनुका यांसारख्या ड्रायफ्रूट्सचाही समावेश करा. हे तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवतील आणि शरीराला आवश्यक पोषण मिळेल.
2. साबुदाणा खिचडी
उपवासात साबुदाणा खिचडी हा लोकप्रिय आणि पौष्टिक पदार्थ आहे. खिचडी बनविण्यासाठीसाबुदाणा, शेंगदाणे, बटाटे आणि हिरवी मिरची वापरतात. साबुदाणा एनर्जीने भरलेला असतो आणि पोट जास्त काळ भरलेले राहते. तुम्ही त्यात तूप आणि हिरवी कोथिंबीर घालून ते अधिक स्वादिष्ट बनवू शकता.
3. भगरीचा भात
भगरीचा भात, ज्याला उपवासाचा भात देखील म्हणतात, हा एक उत्तम पर्याय असू शकतो. तुम्ही याला सामान्य खिचडीप्रमाणे बनवू शकता किंवा त्यात बटाटे, शेंगदाणे आणि हिरवी मिरची घालून त्याची चव वाढवू शकता. त्यासोबत दही किंवा पुदिन्याची चटणी तोंडी लावणे उत्तम.
4. मखाणा खीर
मखाणा खीर हा उपवासासाठी गोड आणि चविष्ट पर्याय आहे. मखाणाला फॉक्स नट्स असेही म्हणतात. मखाणेदुधात शिजवून आणि त्यात साखर, वेलची आणि सुका मेवा घालून खीर बनवली जाते.
5. भगरीच्या पिठाची पुरी
भगरीचे पीठ हे उपवासात वापरल्या जाणाऱ्या पिठांपैकी एक आहे. त्यापासून बनवलेली पुरी किंवा पराठा उपवासात खाल्ला जातो. हे बटाटे किंवा दह्यासोबत खाऊ शकतो. भगरीचे पीठ ग्लूटेन-फ्री असते आणि सहज पचते.
8. पाणी आणि नारळ पाणी
उपवास दरम्यान हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे. ठराविक अंतराने पाणी पिणे चालू ठेवा. नारळ पाणी हा एक उत्तम पर्याय आहे, जो तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यासोबतच शरीराला इलेक्ट्रोलाइट्सचा पुरवठा देखील करतो.
हे पदार्थ टाळा
गहू, तांदूळ, बाजरी, मूग, हरभरा, तूर
खारट गोष्टी जसे मीठ, मिरची, मसाले
कांदा, लसूण आणि इतर तामसिक गोष्टी.
चहा, कॉफी आणि इतर कॅफिनयुक्त पेये. उपवासात फक्त हलका आणि सकस आहार घ्या
( वरील लेख सामान्य माहितीवर आधारित आहे, योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)












Click it and Unblock the Notifications