ChatGPT च्या मदतीने शॉर्ट कंटेंट कसा लिहावा? ट्रिक जाणून घ्या
तुम्ही ChatGPT चा वापर करून शॉर्ट आणि प्रभावी कंटेंट तयार करू इच्छिता का? जर होय, तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. बऱ्याच वेळा प्रॉम्प्ट (सूचना) देताना आपण गोंधळात पडतो. विशेषतः शॉर्ट कंटेंटसाठी योग्य प्रॉम्प्ट कसा द्यायचा, हे माहित नसल्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. चला तर मग, योग्य पद्धतीने आणि कमी शब्दांत प्रभावी कंटेंट तयार करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया.

आधी ठरवा - तुम्हाला नेमकं काय हवंय?
ChatGPT वापरण्यापूर्वी विषय स्पष्ट करा. तुम्हाला किती शब्दांत कंटेंट हवा आहे - 50 शब्द, 100 शब्द? कंटेंटचा हेतू काय आहे - माहिती द्यायची आहे, प्रमोशन करायचं आहे, की सोशल मीडिया पोस्ट हवी आहे?
उदाहरण - "मला Instagram साठी 100 शब्दांमध्ये एक प्रेरणादायी कॅप्शन हवं आहे."
प्रॉम्प्ट सरळ आणि स्पष्ट ठेवा
ChatGPT ला जर जास्त गुंतागुंतीच्या सूचना दिल्या, तर उत्तरही जटिल होऊ शकतं. त्यामुळे नेमकं काय हवं आहे, हे थेट आणि सोप्या भाषेत सांगा.
हवं असलेलं स्वरूप आधीच सांगा
तुम्हाला यादी हवी आहे की परिच्छेद? स्लोगन हवाय की संवाद स्वरूपात उत्तर? याची कल्पना आधीच द्या.
उदाहरण "सकाळी उठण्याचे फायदे 5 पॉइंट्समध्ये सांग. प्रत्येक पॉइंट फक्त 1 ओळीत असावा."
आवश्यक असल्यास भाषा आणि टोन ठरवा
तुमचा कंटेंट मैत्रीपूर्ण, व्यावसायिक, प्रेरणादायी किंवा विनोदी अशा कोणत्या शैलीत हवा आहे, हे ठरवा आणि तसंही ChatGPT ला सांगा. त्यामुळे परिणाम तुमच्या गरजेनुसार मिळतो.
शॉर्ट कंटेंटसाठी हे प्रॉम्प्ट वापरा
- 100 words पेक्षा कमी मध्ये उत्तर द्या
- Instagram कॅप्शन स्टाईलमध्ये लिहा
- आकर्षक headline द्या
- Reel मध्ये बोलता येईल अशी ओळ तयार करा
- 3 ओळीत उत्तर द्या












Click it and Unblock the Notifications