Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

फायद्याची गोष्ट! 'एअरटेल'ची ग्राहकांना मोठी भेट; 'हे' सबस्क्रिप्शन वर्षभर पुर्णपणे मोफत, जाणून घ्या

Airtel Perplexity Pro Subscription Free for a Year : आपल्या ग्राहकांसाठी एअरटेल टेलिकाॅम कंपनीने मोठी घोषणा केली आहे. एअरटेल आपल्या युजर्संना एक मोठी भेट देत आहे. कंपनीने एअरटेल थँक्स अॅपद्वारे युजर्संना एका वर्षासाठी परप्लेक्सिटी प्रो प्लॅन पूर्णपणे मोफत देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हा प्लॅन १७ हजार रुपयांचा आहे. त्यामुळे आता या प्लॅनची गरज असलेले आणि इतरांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

आता एअरटेल ग्राहकांसाठी ही नामी संधी असून परप्लेक्सिटी प्रो प्लॅनचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. चला जाणून घेऊया, नेमके काय करावे लागेल.

Airtel Perplexity Pro Subscription

'एअरटेलवर परप्लेक्सिटी प्रो'चे मोफत सबस्क्रिप्शन कसे मिळवायचे?

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर एअरटेल थँक्स अॅप उघडा, जर नसेल तर ते प्ले-स्टोअरमधूनही डाऊनलोड करता येते.
  • होमपेजवरून, 'रिवॉर्ड्स आणि ओटीटी' विभागात जा.
  • तिथे तुम्हाला परप्लेक्सिटी प्रो प्लॅनची ऑफर दिसेल त्यावर टॅप करा.
  • टॅप केल्यावर तुम्ही एका वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन सक्रिय करू शकता.

AIM च्या अहवालानुसार, ही ऑफर पोस्टपेड वापरकर्त्यांना दिली जात आहे, परंतु अनेक युजर्स एक्सवर असे नोंदवले आहे की, त्यांना प्रीपेड प्लॅनवर देखील ही ऑफर मिळाली आहे.

Perplexity Pro प्लॅनमध्ये तुम्हाला काय मिळेल?

Perplexity ही एक अमेरिकन AI स्टार्टअप आहे जी प्रगत वेब शोध आणि जनरेटिव्ह AI टूल्स प्रदान करते.
ChatGPT आणि Gemini सारख्या मोठ्या AI प्लॅटफॉर्मशी ही परप्लेक्झिटी स्पर्धा करते.

या प्लॅनचा फायदा काय?

Perplexity Pro मध्ये उपलब्ध 5 टूल्स OpenAI च्या GPT-4o, Claude 4.0, xAI च्या Grok 4 सारख्या शक्तिशाली मॉडेल्समध्ये एक्सेस मिळणार

Pro आणि Reasoning मोडमध्ये सर्च करा फाइल विश्लेषण, इमेज जनरेशन

API क्रेडिट्स आणि प्रायोरिटी सपोर्ट

लॅब्स फीचर: रिपोर्ट्स, स्प्रेडशीट्स, डॅशबोर्ड आणि बेसिक वेब अॅप्ससाठी प्रगत साधने
ही सेवा अँड्रॉइड, आयफोन, विंडोज, मॅक आणि वेब ब्राउझरवर उपलब्ध आहे.

गुगलही देत आहे AI चे मोफत सबस्क्रिप्शन

गुगलही AI च्या शर्यतीत शक्तिशाली टक्कर देत आहे. १५ जुलै रोजी, गुगलने भारतातील १८+ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी जेमिनी एआय प्रो प्लॅन एका वर्षासाठी मोफत दिला आहे. ज्याची किंमत १९,५०० रुपये आहे. यामध्ये गुगलचे सर्वात शक्तिशाली मॉडेल जेमिनी २.५ प्रो, डीप रिसर्च, नोटबुकएलएम आणि व्हिओ ३ (व्हिडिओ जनरेशन टूल) यांचा समावेश आहे. भारतात एआयची वाढती क्रेझ पाहता, एअरटेल आणि गुगलचे हे पाऊल वापरकर्त्यांसाठी एक उत्तम संधी आहे. एअरटेल वापरकर्त्यांना प्रीमियम एआय टूल्स मोफत मिळत असताना, विद्यार्थ्यांना गुगलच्या सर्वात शक्तिशाली एआय मॉडेल्सचा मोफत वापर केला जात आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+