आता एआयच्या मदतीने व्हिडिओ बनवा आणि पैसे कमवा! व्हिडिओ तयार करण्यासाठी कॅमेरा-स्टुडिओचीही गरज नाही
AI video creation make it free and earn money : जग आता खरंच तंत्रज्ञानाधिष्ठित झाले असेच म्हणावे लागले. सध्या व्हिडिओ कंटेंटचा जमाना आहे, कुठेही फिरायला जा अथवा लग्न-समारंभात जा फोटो आणि व्हिडिओशिवाय या गोष्टी पुर्ण होऊच शकत नाही. अगदी लहान मुलांच्या शाळेतील कार्यक्रमाचाही व्हिडिओ काढून त्याला एडीट करुन युट्यूबवर अपलोडींगपर्यंत सर्व कामे केली जात आहेत. पण यातून तुम्हाला जर पैसे मिळाले तर..
होय तुम्हाला आता एआय म्हणजेच 'कृत्रिम बुद्धीमत्ता'च्या मदतीने व्हिडिओ बनवता येणार आहेत एवढेच नाहीतर पैसेही कमावता येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने आता अशी अनेक कामे सहज करता येत आहेत. एआयच्या माध्यमातून व्हिडिओ एडिटिंग आता खूप सोपे झाले आहे. तुम्ही मोफत एडिटिंग कौशल्ये शिकून घरी बसून पैसे देखील कमवू शकता.

जर तुम्हाला व्हिडिओ बनवण्याची आवड असेल तर एआय तुमची समस्या सोपी करण्यासाठी आहे. आता महागड्या कॅमेऱ्याची गरज नाही आणि एडिटिंग टूल्सच्या कमतरतेमुळे तुम्हाला त्रास होणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने तुम्ही महागड्या कॅमेऱ्यांशिवाय आणि स्टुडिओशिवाय उत्तम व्हिडिओ बनवू शकता आणि त्यांचे सर्वोत्तम एडिटिंग देखील करू शकता.
एआय व्हिडिओ एडिटिंग खूपच सोप्पे! रिचही चांगला (AI video creation)
एआयच्या मदतीने व्हिडिओ बनवणे जितके सोपे आहे तितकेच एडिटिंग देखील आता सोपे आहे. विशेषतः जे विद्यार्थी किंवा व्यावसायिक एडिटिंगसारख्या कौशल्यांद्वारे अर्धवेळ काम करून पैसे कमवू इच्छितात त्यांच्यासाठी, एआय टूल्ससह व्हिडिओ एडिटिंग हा एक चांगला पर्याय आहे. काही एआय टूल्स मोबाइल फ्रेंडली आहेत, ते घरून व्हिडिओ एडिटिंगसाठी वापरता येतात.
कसे करु शकता व्हिडिओ... ही आहेत टुल्स (AI video creation)
Synthesia.io: अवतारांसह व्हिडिओ जनरेट करू शकते. यामध्ये, १२० पेक्षा जास्त भाषांमध्ये ऑटोमेटेड व्हॉइस ओव्हर करता येते. येथे व्हिडिओ एडिटिंगसाठी कॅमेरा देखील आवश्यक नाही.
InVideo: कस्टम टेम्पलेट्स, एआय जनरेटेड स्क्रिप्ट्स, मार्केटिंग आणि शैक्षणिक व्हिडिओंसाठी एक उत्तम पर्याय असू शकतात. विशेषतः शॉर्ट्ससाठी याचा खूप वापर केला जात आहे.
Lumen5: मजकूर स्लाइडशो व्हिडिओमध्ये रूपांतरित करू शकते. हे बहुतेक YouTube आणि Instagram रील्ससाठी वापरले जाते.
Pictory.ai: ब्लॉग किंवा लेखांमधून व्हिडिओ तयार करू शकते आणि सोशल मीडिया क्लिप शेअर करण्यासाठी त्याचा खूप वापर केला जात आहे. या टूलमध्ये ऑटोमेटिक सबटायटल फीचर प्रदान करण्याची सुविधा देखील आहे.












Click it and Unblock the Notifications