Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'तुझं सौंदर्य पाहून अवाक झालो', सागरिका घाटगेच्या पोस्टवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

Sagarika Ghatge Share Instagram Post: भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेशी 2017 साली लग्न केल आहे. सागरिका घाटगेने 2007 साली चक दे ​​इंडिया या चित्रपटातून प्रेक्षकांमध्ये आपली छाप पाडली होती, ज्यामध्ये तिने हॉकीपटूची भूमिका केली होती. झहीर खानची प्रेमकहाणी फिल्मी कथेपेक्षा काही कमी नाही.

2014 साली झाली होती पहिली भेट

झहीर आणि सागरिकाची प्रेमकहाणी 2014 मध्ये सुरू झाली जेव्हा दोघेही एका कॉमन फ्रेंडद्वारे भेटले होते. आधी त्यांची मैत्री झाली, नंतर हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर दोघांनीही त्यांच्या नात्याचा जाहीरपणे स्वीकार केला.

sagarika ghatge

2017 मध्ये अडकले विवाह बंधनात

झहीर खान आणि सागरिका घाटगे यांचे 2017 साली लग्न झाले. 23 नोव्हेंबर 2017 रोजी दोघे विवाह बंधनात अडकले. त्यांचे लग्न एका सुंदर समारंभात झाले होते, ज्यात फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. झहीर खान सध्या आयपीएल मेगा लिलावात लखनऊ सुपर जायंट्ससोबत दिसला होता. तर सागरिका घाटगे मागील काही वर्षा दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर आहे.

सागरिकाची सोशल मिडिया पोस्ट चर्चेत

सागरिका घाटगे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती अनेकदा स्वतःचे आणि कुटुंबाचे फोटो शेअर करत असते. अलीकडेच, शुक्रवारी संध्याकाळी म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी सागरिकाने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये ती कारमध्ये बसलेली दिसत आहे. तिने या फोटोमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या असून प्रत्येक फोटोत तिचे स्मित आणि सौंदर्य पाहायला मिळत आहे.

सागरिकाच्या सोशल मिडिया पोस्टवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

सागरिकाने सोशल मिडीयावरील पोस्टला एक कॅप्शन दिलं आहे, "A few moments from today," जे सूचित करते की हे फोटो त्या दिवसातील काही खास आठवणी आहेत. सागरिकाची ही पोस्ट तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. सागरिकाच्या फोटोवर एका चाहत्याने लिहिले की, 'तुझे सौंदर्य पाहून मी अवाक झालो' आहे. इतर यूजर देखील या पोस्टवर सतत कमेंट करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+