धनश्रीसोबत घटस्फोट झाल्यानंतर चहलचा पुन्हा मिस्ट्री गर्ल सोबत, व्हिडीओ व्हायरल, कोण आहे ही तरुणी ?
प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री वर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल यांच्यात घटस्फोट झाला आहे. या जोडप्याने 20 मार्च रोजी घटस्फोटाची घोषणा केली आहे. दरम्यान दोघांनीही अद्याप त्यांच्या वेगळे होण्याचे कारण उघड केलेले नाही. दरम्यान या जोडप्याने किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्यांच्या अधिकृत निवेदनात दोघांनीही म्हटले आहे की, त्यांनी परस्पर संमतीने आणि चांगल्या संबंधसह वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
वांद्रे कुटुंब न्यायालयाने 20 मार्च रोजी धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाला मान्यता दिली. आयपीएल 2025 सुरु होण्याच्या अगदी दोन दिवस ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. आता आयपीएल सुरु झाल्यानंतर चहलचा आणखी एक व्हिडिओ चर्चेत आहे, ज्यामध्ये तो आयपीएल 2025 दरम्यान एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला आहे. हा व्हिडिओ पंजाब किंग्जने आपल्या सोशल मिडिया प्लेटफॉर्मवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये युजवेंद्र चहल आणि मिस्ट्री गर्ल टीमच्आ खेळाडूंबद्दल बोलत आहेत. युजवेंद्र चहल फोनवर पहिल्या मॅचसाठी एक फास्ट बॉलर आणि ऑलराऊंडर असायलचा हवा, असं म्हणत आहे. चहल आणि मिस्ट्री गर्ल संघात किती खेळाडू असावेत आणि कोण कोण असावे याबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर ही मिस्ट्री गर्ल कोण आहे ? याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
कोण आहे चहलसोबतची ही नवी मिस्ट्री गर्ल
चहलसोबत टीमच्या रणनितीबद्दल चर्चा करत असलेली मिस्ट्री गर्लचं नाव मेघा सुखीजा असं आहे. तिच्या लिंक डीन प्रोफाईलनुसार ती एक कंटेट क्रिएटर असल्याचं कळतयं. तिच्या इंन्सटग्राम अंकाऊटवर जवळपास 5 लाख फॉलोअर्स आहेत. याशिवाय, ती क्लोदिंग ब्रँड एपिसोड्सची सह-संस्थापक आहे. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक रील्स शेअर करत राहते.
आयपीएल 2025 साठी युजवेंद्र चहलला पंजाब किंग्स संघाने 18 कोटी रुपये देऊन आपल्या ताफ्यात घेतलं आहे. 25 मार्च झालेल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुध्द गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला. त्यावेळी अटीतटीच्या सामन्यात पंजाबने गुजरातचा पराभव केला आहे. या सामन्यात युजवेंद्र चहले 3 षटकात 34 धावा दिल्या आहेत. मात्र चहला या सामन्यात एक विकेट मिळवता आली नाही.
दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी भारत विरुध्द न्यूझीलंडच्या अंतिम सामन्यात युजवेंद्र चहल सोबत आर. जे. माहवाश दिसल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.यानंतर या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू आहे की काय अशी चर्चा सुरू झाली होती.












Click it and Unblock the Notifications