Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

युजवेंद्र चहलने RJ महविशला खुलेआम KISS केला; व्हिडिओ व्हायरल, पण त्यामागील सत्य नेमकं काय?

Yuzvendra chahal kiss video Viral : धनश्री वर्मापासून वेगळा झालेला युजवेंद्र चहलने दुबईमध्ये आरजे महविशसोबत बसून चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पाहिला. यानंतर या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी जोरदार चर्चा केली. लोक म्हणाले आता नवीन भाभी मिळाली का, असे प्रश्न देखील केले. अशातच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात क्रिकेटपटूने त्याच्या कथिक प्रेयसीसोबत खुलेआम किस घेतला आहे. परंतु या व्हिडिओवरुन आता वादंग निर्माण झाला आहे. चला तर नेमकं सत्य काय आहे, हे जाणून घेऊया..!

महविशने शेअर केला दोघांचा फोटो

महविशने युजवेंद्र चहलसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यात ते दोघे एकत्र बसून सामन्याचा आनंद घेत असल्याचे दिसून आले. दोघेही मोकळेपणाने बोलत आणि हसत असल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोक असा अंदाज लावू लागले की चहलच्या आयुष्यात प्रेम परत आले आहे. त्याचे आयुष्य पुन्हा एकदा आनंदाने भरून जाणार आहे. दरम्यान, चहल आणि महविश यांच्यातील नात्याबद्दल कोणतीही पुष्टी झालेली नाही.

yuzvendra chahal

किसिंगचा व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर धुमाकूळ

युजवेंद्र आणि आरजे महविशसोबतचा दुसरा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये ते एकमेकांना खुलेआम किस घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक थक्क झाले. चाहत्यांनी यावर टिप्पणी देखील सुरु केली आहे. परंतु हा व्हिडिओ एक लिप-लॉक व्हिडिओ आहे.

हे ही वाचा : भारत-न्यूझीलंड फायनलमध्ये युझवेंद्र चहल 'मिस्ट्री गर्ल'सोबत दिसला, ती तरुणी कोण ? व्हिडीओ व्हायरल

आम्ही या व्हिडिओबाबत सर्च केले असता हा व्हिडिओ सत्य नसल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ चहल आणि महविशचा असल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर, जेव्हा गुगलची मदत घेण्यात आली तेव्हा प्रकरण काहीतरी वेगळेच असल्याचे आढळून आले.

फॅक्ट चेकमध्ये वेगळंच दिसून आलं?

गुगल इमेजेसवर गेल्यानंतर असे काहीही आढळले नाही. परंतु सामन्याच्या दिवसाचा व्हायरल फोटो आला, जो या लेखात फोटो म्हणून वापरला आहे. याशिवाय, व्हिडिओची प्रतिमा घेऊन आणि रिव्हर्स इमेजवर तपासल्यानंतरही काहीही आढळले नाही. यावरून हे व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने तयार करण्यात आल्याचे उघड झाले. आजकाल सोशल मीडियावर असे डीपफेक व्हिडिओ खूप पाहिले जातात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+