Year Ender 2024: संजू, सूर्या आणि रोहित यांच्यात टक्कर? या वर्षात T20 मध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या ?
Year Ender 2024: टीम इंडियासाठी 2024 हे वर्ष अतिशय शानदार राहिलं आहे. याच वर्षी टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून टीम इंडियाने विजेतेपद पटकावले होते. रोहित शर्मा आणि टीम इंडियासाठी हा सर्वोत्तम क्षण होता.
या वर्षी T20 क्रिकेटमध्ये भारताच्या अनेक फलंदाजांनी आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला पण एकच हिरो असू शकतो. सर्वाधिक धावा करणारा फलंदाज चर्चेत राहतो. या वर्षात भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल फलंदाजांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

संजू सॅमसन: 2024 हे वर्ष संजू सॅमसनसाठी खास राहिलं आहे. या वर्षात संजूने गोलदांजी चांगलीच धुलाई केली आहे. सॅमसनच्या बॅटमधून तीन शतकी खेळी केल्या, त्यापैकी दोन शतके एकाच मालिकेत केली आहेत. सॅमसनने 13 सामन्यात 436 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 180 पेक्षा जास्त राहिला आहे. या संपूर्ण वर्षात त्याने 31 षटकार लागले आहेत.
सूर्यकुमार यादव: भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचे नाव यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्याने आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. मात्र, या वर्षी त्याच्या बॅटने 18 सामन्यात 429 धावा केल्या आहेत. त्याने 4 अर्धशतकांच्या खेळी केल्या आहेत. सूर्याला या वर्षी एकही शतकी खेळी खेळता आली नाही.
रोहित शर्मा: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माचे नावही या यादीत सामील आहे. रोहित शर्माने यावर्षी सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. T20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने निवृत्ती घेतली. रोहित शर्माने 11 सामने खेळून 378 धावा केल्या आहेत. रोहितने या वर्षात एक शतक झळकावलं आहे.
हार्दिक पांड्या : या यादीत शानदार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचेही नाव आहे. पांड्याने यावर्षी टी-20 मध्ये एकूण 17 सामने खेळले आणि 352 धावा केल्या. पंड्याने एक अर्धशतक आणि 19 षटकार ठोकले आहेत.
तिलक वर्मा : या फलंदाजाने सलग दोन शतके झळकावून दक्षिण आफ्रिकेत खळबळ उडवून दिली होती. या यादीत तिलक वर्माला स्थान मिळवलं आहे. त्याने केवळ 5 सामने खेळून 306 धावांचा आकडा गाठला आहे.












Click it and Unblock the Notifications