Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Year ender 2024 :गुगलवर सर्वात जास्त सर्च झाली विनेश फोगाट, वाचा दुसऱ्या, तिसऱ्या चौथ्या नंबरवर कोण?

Year ender 2024 : यंदाचे वर्ष सरणार आणि नवीन वर्ष लागणार वर्षामागून वर्ष जाणार नवीन येणार हे चक्र सुरुच राहणार पण गुगल मात्र तेच आहे. या गुगलवर असा एक निमिशही नाही की, कुणी काही सर्च केले नाही असे होणारच नाही. गुगलवर 2024 या वर्षात सर्वाधिक काय सर्च झाले असेल तर ती व्यक्ती म्हणजे विनेश फोगाट होय.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये डंका पिटणारी आणि वजनगटातील काही त्रृटींमुळे खूपच चर्चेत आलेली कुस्तीपटू विनेश फोगट ही गुगल सर्च इंजिनच्या 'इयर इन सर्च 2024' अहवालानुसार, भारतात ती गुगलवर सर्वाधिक सर्च केली जाणारी रेसलर आहे. फोगटची सहकारी ऑलिंपियन साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी गेल्या वर्षी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन प्रमुख आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सदस्य ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध कुस्तीपटूंच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.

Year ender 2024

विनेश फोगाट ऑलिम्पिक फायनल खेळण्यापासून वंचित

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ती फायनलसाठी पात्र ठरला, पण सामन्यापूर्वी जवळपास शंभर ग्रॅम जास्त वजन आढळून आले. त्यामुळे कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टने तिचे अपील फेटाळले यामुळे विनेशला तिचा अंतीम सामना खेळता आला नाही आणि पदकापासून तिला वंचित राहावे लागले.

हेही वाचा : Google Year In Search 2024: स्त्री ते हिरामंडी! एक वर्षात गुगलवर 'हे' चित्रपट सर्वात जास्त झाले सर्च

राजकारणात प्रवेश, बनली आमदार

विनेश फोगाट हिने पॅरिस ऑलिम्पिकनंतर काही दिवसांतच काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. तिने हरियानातील जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयही मिळवला.

सर्चमध्ये दुसऱ्या स्थानावर कोण?

गुगल सर्चमध्ये दुसऱ्या स्थानावर कोण? असा साहाजिकच प्रश्न पडणार आम्ही सांगतो की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दुसऱ्या स्थानावर आहेत. भारतातील Google वर दुसरे सर्वाधिक शोधले जाणारे ते आहेत. जे जानेवारीमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये पुन्हा सामील झाले आता 12 जागांसह ते एनडीए सरकारचा एक भाग आहेत.

हेही वाचा : Year ender 2024 : वर्षात कुणाचे संसार तुटले! जाणून घ्या बाॅलीवूडमधील ब्रेकअप अन् घटस्फोट!

सर्चमध्ये तिसऱ्या क्रमांकावर चिराग पासवान

गुगल सर्चमध्ये तिसऱ्या क्रमांकावर लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांचे नाव आहे. ते भाजपचे सहयोगी देखील आहेत. माजी अभिनेते असलेले चिराग पासवान आता भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत.

हेही वाचा : Year Ender 2024 : वर्ष 2024 'या' खेळाडूंसाठी ठरले नशीबवान; एका रात्रीतून बनले करोडपती

सर्चमध्ये चौथ्या स्थानावर हा क्रिकेटर

भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा गुगल सर्चमध्ये चौथ्या स्थानावर राहिला आहे. आक्रमक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची गणना होते. तो भारतीय क्रिकेट संघाचा महत्वाचा फलंदाज आणि गोलंदाज आहे. जूनमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पंड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या विजयाचे शेवटचे षटक टाकले होते, या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ विश्वविजेता बनला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+