Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Year ender 2024 : वर्षात कुणाचे संसार तुटले! जाणून घ्या बाॅलीवूडमधील ब्रेकअप अन् घटस्फोट!

Year ender 2024 : हे वर्ष सरत आहे आणि नव्या वर्षाची आस आता सर्वांनाच लागली आहे. नव्या वर्षात अनेक संकल्प आणि मनोकामना पुर्ण करण्यासाठी जो तो प्रयत्नशील आहे. अशातच जुने लागूद्या मरणा लागूनी अशी म्हण सर्वश्रूत आहे. म्हणजेच सरलेल्या काळात.. 2024 मध्ये जे जे वाईट घडले ते विसरुन जा आणि पुढे चला असा याचा आशय आहे. हे वर्ष अनेकांच्या जीवनात फारच निराशा देऊन गेले तर काहींचे स्वप्न साकार करुन गेले.

बाॅलीवूडचा विचार केल्यास या वर्षात बाॅलीवूडकरांसाठी हे वर्ष समिश्र ठरले. लग्न घटस्फोटाचील चर्चा करायची झाल्यास या वर्षात अनेकांना नवीन जोडीदार मिळाले तर 29 वर्षांची साथ असलेले वैवाहिक जीवनाचा धागा तुटल्याचेही उदाहरणे समोर आली. 2024 मध्ये कुणाचे सहा वर्षांचे नाते टिकले नाही तर कुणाचे 29 वर्षांचे लग्न मोडले. आज आम्ही तुम्हाला अशा जोडप्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांचे या वर्षी प्रेम तुटले आणि ते प्रेमातून वेगळे झाले.

Year ender 2024

1. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक

चाहत्यांना हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक खूप आवडतात. या जोडप्याने 2020 मध्ये लग्न केले. दोघेही अनेकदा त्यांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. पण लग्नाच्या 4 वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटानंतर त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. काहींनी तर नताशाला गोल्ड डिगर म्हणून टॅग केले.

2. उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर

मीर उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर मीर यांचा विवाह 2016 साली झाला होता. पण लग्नाच्या 8 वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. वृत्तांवर विश्वास ठेवला तर दोघांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

3. एआर रहमान आणि सायरा बानो

एआर रहमान आणि सायरा बानो यांचा विवाह 1995 साली झाला होता. पण लग्नाच्या 29 वर्षानंतर या जोडप्याने घटस्फोटाची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. या वर्षी नोव्हेंबरमध्ये या जोडप्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले होते की ते परस्पर संमतीने वेगळे होत आहेत.

4. दलजीत कौर निखिल पटेल

दलजीत कौरचे गेल्या वर्षी बिझनेसमन निखिल पटेलसोबत दुसरे लग्न झाले. ही अभिनेत्री आपल्या मुलासह परदेशात शिफ्ट झाली होती. पण लग्नानंतर 10 महिन्यांनीच ती भारतात परतली. दलजीतने एका मुलाखतीदरम्यान खुलासावजा आरोप केला की, निखिल तिची फसवणूक करत आहे म्हणून त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

5. धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत

धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत गेल्या 18 वर्षांपासून वैवाहिक नात्यात होते. 2022 मध्ये दोघेही वेगळे झाले. चेन्नईच्या कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. आता 2024 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला आहे.

6. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. या वर्षी दोघे लग्न करतील अशी चाहत्यांना आशा होती. मात्र सिंघम अगेन या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अर्जुन कपूरने तो सिंगल असल्याची घोषणा केली आणि मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा दिला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+