year ender 2024 मध्ये T-20 मध्ये या 5 बाॅलर्सची कामगिरी लय भारी! Top 5 मध्ये 'हा' भारतीय खेळाडू
Year ender 2024 : भारतीय क्रिकेटसाठी 2024 हे वर्ष चांगले गेले. विशेषतः टीम इंडियासाठी टी-20 क्रिकेटच्या दृष्टीने खूप चांगले आहे. भारताशिवाय इतर अनेक संघांनीही यंदा आपल्या खेळाने मने जिंकली आहेत. 2024 हे वर्ष तसे पाहता खासच आहे कारण टीम इंडियाने T20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे.
या वर्षात गोलंदाजांनीही यंदा आपल्या खेळाची छाप पाडली आहे. भारताचा एक क्रिकेटर असाही आहे, ज्याच्या गोलंदाजीने विरोधी संघाच्या फलंदाजांना सळो की, पळा करुन सोडले. या लेखात सर्वाधिक बळी घेणाऱ्या पाच खेळाडूंचा उल्लेख करण्यात आला आहे.

एहसान खान : हा गोलंदाज हाँगकाँगचा आहे. यावर्षी टी-20मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम या गोलंदाजाच्या नावावर आहे. एहसान खानने 27 सामने खेळताना 46 विकेट्स घेतल्या. चार वेळा एका डावात 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.
हेही वाचा : Year Ender 2024:अपघातानंतर दमदार पुनरागमन, IPLचा सर्वात महागडा खेळाडू, ऋषभ पंतसाठी हे वर्ष कसं होतं?
जुनैद सिद्दीकी : हा क्रिकेटर UAE मधून आला आहे. त्याने 25 सामन्यात एकूण 40 विकेट घेतल्या आहेत. 14 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. एका डावात 4 बळी घेण्याचा पराक्रम त्याने दोनदा केला आहे. त्याची चमकदार गोलंदाजी प्रभावी आहे.
हेही वाचा : Year Ender 2024: बुद्धिबळापासून पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत, हे वर्ष क्रीडा जगतासाठी कसे राहिले, घ्या जाणून
उस्मान नजीब : सौदी अरेबियातून आलेल्या उस्मान नजीब या गोलंदाजाने यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. सर्वात लहान फॉरमॅटमध्ये, या गोलंदाजाने यावर्षी एकूण 21 सामने खेळले आणि 38 बळी घेतले.
अर्शदीप सिंग : अर्शदीप सिंग हा पहिल्या पाचमध्ये एकमेव भारतीय आहे. अर्शदीपने टीम इंडियासाठी 18 सामने खेळले आणि 36 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंगने एका डावात एकदाच 4 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.
हेही वाचा : Year Ender : T-20 वर्ल्डकप ते लास्ट सीरिज, 2024 मध्ये भारतीय महिला संघाची कशी राहिली कामगिरी
यासीन पटेल : पटेल कुवेतकडून खेळतो आणि या वर्षी T20 मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण 36 विकेट घेतल्या. त्याच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर, 6 धावांत 3 बळी आहे.












Click it and Unblock the Notifications