Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Year Ender 2024:अपघातानंतर दमदार पुनरागमन, IPLचा सर्वात महागडा खेळाडू, ऋषभ पंतसाठी हे वर्ष कसं होतं?

Year Ender 2024: टीम इंडीयाचा विकेटकिपर ऋषभ पंतसाठी 2022 हे वर्ष मोठी परीक्षा होती. त्यावेळी त्याच्या मर्सिडीज कारला भीषण अपघात झाला होता. हा अपघात पंतसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हता, कारण कारला आग लागली आणि ते गंभीर जखमी झाला होता. पण, पंतने पराभव स्वीकारला नाही क्रिकेटच्या मैदानावर जोरदार पुनरागमन केलं. या अपघातानंतर ऋषभ पंतसाठी 2024 हे वर्ष कसे गेले ते जाणून घेऊया?

अपघातानंतर जोरदार पुनरागमन

या अपघातातून सावरल्यानंतर ऋषभ पंतने मैदानावर शानदार पुनरागमन केले. पंतने आपल्या खेळाप्रती उत्कटता दाखवली. कितीही संकटे आली तरी आत्मविश्वास आणि संघर्ष असेल तर कोणत्याही अडचणीवर मात करता येते हे त्यांनी सिद्ध केले. ऋषभ पंतनेही टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध मॅचविनिंग इनिंग खेळली होती.

Rishabh Pant

IPL 2024 च्या माध्यमातून पुन्हा मैदानात परतला

अपघातातून सावरल्यानंतर ऋषभ पंत आयपीएल 2024 च्या माध्यमातून क्रिकेटच्या मैदानात परतला. यानंतर त्याला भारताच्या 15 सदस्यीय T20 विश्वचषक 2024 संघात स्थान मिळालं. पंतने 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती, ज्यामध्ये त्याने 117 धावा केल्या. त्याबरोबरच त्याने विकेटच्या मागे 14 खेळाडूंना बाद केले. पंतने आपल्या दमदार कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली.

पंतने लिलावात इतिहास रचला

ऋषभ पंतसाठी 2024 हे वर्ष खरोखरच खास होते. आयपीएलमध्ये पंतने जोरदार पुनरागमन केल्यानंतर त्याने अनेक विक्रम केले. एकीकडे भीषण अपघातानंतर त्याने शानदार रिकव्हरी केली, तर दुसरीकडे आयपीएल 2024 च्या लिलावात त्याने इतिहास रचला. लखनऊ सुपर जायंट्सकडून 27 कोटी रुपयांत खरेदी केल्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा विक्रम केला.

पंतने धोनीची बरोबरी केली

ऋषभ पंतने 2024 साली बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय विकेटकिपर आणि फलंदाज म्हणून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने 125 चेंडूत शतक झळकावलं, जे त्याच्या कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक होते. या शतकासह त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या सहा शतकांची बरोबरी केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+