टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने बाबर आझमला मागे टाकले, T20 क्रमवारीत मोठा बदल
ICC T20I Rankings: श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका संपल्यानंतर आयसीसीने नवीन आयसीसी रँकिंग जाहीर केली आहे. टी-20 रँकिंगमध्ये मोठा बदल झाला आहे. सर्वोच्च स्थानांमध्ये कोणताही बदल झाला नसून गुणांमध्ये बदल झाला आहे. याचा फायदा भारताच्या युवा सलामीवीराला झाला आहे.
श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा भाग असलेल्या यशस्वी जैस्वालने टी-20 रँकिंगमध्ये बढती मिळाली आहे . त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड अजूनही अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे.

सूर्यकुमार यादवच्या रेटिंग पॉईंटमध्ये मोठे नुकसान झाले आहे. आता तो पहिल्या क्रमांकापासून खूप मागे आहे. हेडला एकूण 844 रेटिंग गुण आहेत. सूर्यकुमार यादवच्या गुणांमध्ये लक्षणीय घट झाली असून तो 805 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. फिल सॉल्ट तिसऱ्या क्रमांकावर असून तो सूर्याच्या जवळ आहे. त्याचे 797 रेटिंग गुण आहेत.
यशस्वी जैस्वालला दोन गुणाचा फायदा झाला असून त्याने आता चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. बाबर आणि जैस्वाल यांच्यात फक्त दोन गुणांचा फरक आहे. जैस्वालला 757 तर बाबरला 755 गुण आहेत.
पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान सहाव्या स्थानावर आहे. टॉप टेनमध्ये 3 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, त्यापैकी तिसरे नाव आहे रुतुराज गायकवाड. तो आठव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचे दोन खेळाडू नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. यामध्ये ब्रँडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स यांच्या नावांचा समावेश आहे.
T20 मधील गोलंदाजांच्या क्रमवारीत रवी बिश्नोई पहिल्या दहामध्ये परतला आहे, पहिल्या दहामध्ये तो एकमेव भारतीय आहे आणि दहाव्या क्रमांकावर आहे. रवी बिश्नोईला आठ स्थानांचा फायदा झाला आहे. इंग्लंडचा आदिल रशीद पहिल्या क्रमांकावर कायम आहे. राशिद खान दुसऱ्या तर हसरंगा तिसऱ्या स्थानावर आहे.












Click it and Unblock the Notifications