Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

WPL Auction 2024-25 :उद्या महिला आयपीएलचा महालिलाव! कुठे पाहाल? कुणाच्या पर्समध्ये किती रक्कम, वाचा

WPL Auction 2024-25 : 2025 च्या हंगामासाठी महिला प्रीमियर लीग (WPL) चा लिलाव बंगळुरू येथील ITC गार्डनिया येथे 15 डिसेंबर रोजी होणार आहे. संघ त्यांच्या रोस्टरला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न करणार आहेत. यावेळी डब्ल्यूपीएलमध्ये बड्या महिला खेळाडूंचा समावेश आहे. आता कोण कोणत्या संघाकडून खेळणार हे येत्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे.

कुणाचा आहे लिलावात समावेश

लिलाव पूलमध्ये यंदा महिला क्रिकेटमधील काही मोठ्या नावांचा समावेश आहे. त्यात इंग्लंडची कर्णधार हीदर नाइट, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ली ताहुहू आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू डिआंड्रा डॉटिन यासारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडू यावेळी लिलावात आहेत. तर भारतीय स्पर्धकांमध्ये अष्टपैलू स्नेह राणा, लेगस्पिनर पूनम यादव आणि फलंदाज वेदा कृष्णमूर्ती यांचा लिलावात समावेश आहे.

WPL Auction 2024-25

कुणाच्या पर्समध्ये किती पैसे?

मेगा लिलावात मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने जेमिमाह रॉड्रिग्ज, शफाली वर्मा आणि ॲलिस कॅप्सी सारख्या प्रमुख खेळाडूंना कायम ठेवले आणि 2.5 कोटींच्या छोट्या पर्ससह ते लिलावात राहतील. गेल्या मोसमात खालच्या स्थानी असलेल्या गुजरात जायंट्सकडे 4.4 कोटींची सर्वात मोठी लिलाव पर्स आहे तर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने यावेळी सात खेळाडूंना सोडले आणि त्यांचा संघ मजबूत करण्यासाठी त्यांच्याकडे 3.25 कोटी रुपये आहेत.

हेही वाचा : आयपीएल लीगची पहिली महिला लिलावकर्ता कोण, त्यांची संपत्ती किती, वाचा सविस्तर

WPL 2025 लिलाव कोठे पाहाल

वुमन्स प्रीमियर लीग 2025 लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema वर असेल. WPL 2025 खेळाडूंचा लिलाव भारतातील Sports18 1 आणि Sports18 1 HD, Star Sports 1 आणि Star Sports हिंदी टीव्ही चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. ते तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहेत.

हेही वाचा : WPL 2025 Auction: महिला प्रीमियर लीगच्या लिलावात 'या' खेळाडूंवर सर्वात मोठी बोली लागणार

असे आहेत संघ

दिल्ली कॅपिटल्स (DC)

ॲलिस कॅप्सी, ॲनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्ज, जेस जोनासेन, मारिझान कॅप, मेग लॅनिंग, मिन्नू मणी, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया, तीतास साधू.

गुजरात जायंट्स (GG)

ॲश्लेह गार्डनर, बेथ मुनी, भारती फुलमाली, दयालन हेमलता, हरलीन देओल, कशवी गौतम, लॉरा वोल्वार्ड, मन्नत कश्यप, मेघना सिंग, फोबी लिचफिल्ड, प्रिया मिश्रा, सायली सातघरे, शबनम शकील, तनुजा कंवर.

मुंबई इंडियन्स (MI)

अमनदीप कौर, अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यूज, जिंतीमणी कलिता, कीर्थना बालकृष्णन, नताली सायव्हर, पूजा वस्त्राकर, एस. सजना, सायका इशाक, शबनीम इस्माईल, यास्तिका भाटिया.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)

आशा शोबाना, डॅनी व्याट, एकता बिश्त, एलिस पेरी, जॉर्जिया वेरेहम, कनिका आहुजा, केट क्रॉस, रेणुका सिंग, रिचा घोष, एस. मेघना, श्रेयंका पाटील, स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन, सोफी मोलिनक्स.

युपी वाॅरीयर (UPW)

एलिसा हिली, अंजली सरवानी, चमारी अथापथु, दीप्ती शर्मा, गौहर सुलताना, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, पूनम खेमनार, राजेश्वरी गायकवाड, सायमा ठाकोर, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्रा, उमा डीनेश, व्ही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+