Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

WPL 2025 Auction: महिला प्रीमियर लीगच्या लिलावात 'या' खेळाडूंवर सर्वात मोठी बोली लागणार

WPL Auction 2025: महिला प्रीमियर लीग (WPL 2025) मधील लिलावासाठी खेळाडूंची यादी 7 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. WPL 2025 लिलाव 15 डिसेंबर रोजी कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे आयोजित केला जाईल.

या लिलावात 120 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यामध्ये 91 भारतीय आणि 29 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. महिला प्रीमियर लीगचा लिलाव 15 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी या लिलावात कोणते 3 खेळाडू सर्वात महागडे विकले जाऊ शकतात ते जाणून घेऊया.

heather knight

फोटो सौजन्य- पीटीआय

स्नेह राणा
भारतातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेली स्नेह राणा WPL मधील पहिल्या दोन हंगामात गुजरात जायंट्सकडून खेळत होती. महिला प्रीमियर लीगचा आतापर्यंतचा प्रवास तिच्यासाठी चांगला राहिला नाही. कारण तिला 12 सामन्यांत केवळ 6 विकेट घेतल्या आहेत. तिची मूळ किंमत 30 लाख रुपये आहे. दरम्यान गुजरातने तिला लिलावापूर्वी रिलीज केलं आहे. मात्र भारतासाठी आत्तापर्यंत तिने 56 मॅचमध्ये 76 विकेट घेतल्या आहेत. त्यासोबतच 402 धावा ही केल्या आहेत.

डायंड्रा डॉटिन
वेस्ट इंडिजची अष्टपैलू खेळाडू डिआंड्रा डॉटिन आतापर्यंत महिला प्रीमियर लीगमध्ये खेळलेली नाही. आगामी लिलावासाठी तिने तिची मूळ किंमत 50 लाख रुपये ठेवली आहे. 132 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2,817 धावा करण्यासोबतच 67 विकेट्सही घेतल्या आहेत. डॉटिन जगभरातील इतर फ्रँचायझी लीगमध्ये सातत्याने खेळत आहे. जगातील अव्वल T20 खेळाडूंमध्ये तिचं नाव अग्रस्थानी आहे. तिच्या महिला प्रीमियर लीगच्या लिलावात करोडोंची बोली लागल्यास नवल वाटायला नको.

हीदर नाइट
महिला प्रीमियर लीगच्या लिलावात इंग्लंडची कर्णधार हीदर नाइट देखील चांगलीच चर्चेत आहे. गेल्या वर्षीच्या लिलावात तीची हुकली होती, पण यावेळी ती पुनरागमन करत आहे. तिची मूळ किंमत 50 लाख रुपये आहे. ती यापूर्वी आरसीबीकडून खेळली आहे. आतापर्यंत तिने 8 सामन्यात 135 धावा करण्यासोबतच 4 बळीही घेतले आहेत. कर्णधारपदाचा चांगला अनुभव असल्यामुळे तिला लिलावात मोठी बोली लावली जाऊ शकते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+