Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

WPL 2025 : मुंबई इंडियन्स Vs गुजरात जायंट्स यांच्यातील एलिमिनेटर सामना कधी व कुठे पाहायचा?

WPL 2025, MI vs GG : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आलाय. दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत टॉपला राहात अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या संघासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात उद्या 13 मार्च रोजी लढत होणार आहे. या दोन्ही संघातील विजेता संघ हा दिल्ली कॅपिटल्ससोबत अंतिम सामन्यात लढत देणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत टॉपवर

महिला प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सने 8 सामने खेळत 5 विजय आणि 3 पराभवांसह एकूण 10 गुण मिळवले आहेत. यासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश देखील मिळवला.

यापूर्वीचा हंगामात देखील दिल्ली कॅपिटल्सने प्रवेश केला होता. अंतिम फेरीत गेल्यानंतर तो संघ आता प्रतिस्पर्धी संघाची प्रतीक्षा करत आहे. दरम्यान, उद्या 13 मार्चला एलिमिनेटर सामना मुंबई मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

WPL 2025

मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स कधी आले होते आमनेसामने?

  • मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स या स्पर्धेत दोन वेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही वेळेस मुंबई इंडियन्स गुजरात जायंट्सला लोळवलं आहे.
  • 18 फेब्रुवारीला झालेल्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सला 5 विकेटने पराभूत केलं.
  • तसेच 10 मार्चला झालेल्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजराज जायंट्सला 9 धावांनी पराभूत केलं आहे. जर एलिमिनेटर फेरीत गुजरातने विजय मिळवला, तर आयपीएलच्या तिसऱ्या पर्वात नवा विजेता मिळू शकतो.
  • कारण मागच्या दोन पर्वात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजय मिळवला आहे. मुंबईने गुजरातला हरवत अंतिम फेरी गाठली तर दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्याची त्यांना संधी असणार आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

मुंबई इंडियन्स

हरमनप्रीत कौर (कर्णधार), अक्षिता माहेश्वरी, अमनदीप कौर, अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हेली मॅथ्यूज, जिंतिमनी कलिता, कीर्थना बालकृष्णन, नदिन डी क्लर्क , नॅट सायव्हर-ब्रंट साजारी , नॅट सायव्हर -ब्रंट साजारी , कमलिनी , यास्तिका भाटिया , सायका इशाक , शबनीम इस्माईल , पारुनिका सिसोदिया.

गुजरात जायंट्स

भारती फुलमाली , लॉरा वोल्वार्ड , फोबी लिचफिल्ड , सिमरन शेख , ॲश्ले गार्डनर , डॅनिएल गिब्सन , दयालन हेमलता , डिआंड्रा डॉटिन , हरलीन देओल , बेथ मुनी ( कर्णधार) , काशवी गौतम , मन्नत प्रिषीक , मन्नत प्रिषक , मिकस, , शबनम मो. शकील , सायली सातघरे , तनुजा कंवर

WPL 2025 एलिमिनेटर MI विरुद्ध GG : लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्ट तपशील

WPL २०२५ चा एलिमिनेटर कधी होईल?

WPL २०२५ चा एलिमिनेटर गुरुवार, १३ मार्च रोजी होईल.

WPL 2025 च्या एलिमिनेटर सामन्याचे ठिकाण कोणते असेल?

WPL 2025 चा एलिमिनेटर सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाईल.

WPL 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात कोण खेळेल?

WPL 2025 च्या एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात जायंट्सशी होईल.

WPL 2025 एलिमिनेटर सामन्यासाठी टॉस किती वाजता होईल?

मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील WPL २०२५ एलिमिनेटर सामन्याचा टॉस भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+