RCB vs GG : नाणेफेक जिंकून गुजराचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय; आरसीबीचे ९ षटकांत अर्धशतक
महिला प्रिमिअर लीग-२०२५ मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात सामना सुरु आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु आहे. गुजरात जायंट्सची कर्णधार अॅशले गार्डनरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिचा हा निर्णय काहीसा बरोबर वाटला. गुजरातच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने नऊ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ५२ धावा केल्या.

दोन्ही संघांना हवाय विजय
कर्णधार स्मृती मानधनाच्या नेतृत्त्वाखाली खेळत असलेल्या राँयल चॅलेंजर्सला गेल्या दोन सामन्यांत पराभव पहावा लागला. २१ फेब्रुवारीला मुंबई इंडियन्स ४ विकेट्सने आणि २४ फेब्रुवारीला यूपी वॉरियर्स सुपर ओव्हरमध्ये त्यांचा पराभव केला होता. आजच्या सामन्यात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील संघ हे दोन्ही पराभव विसरुन विजयाचा श्रीगणेशा करण्याचा मूडमध्ये आहे. दुसरीकडे अॅशले गार्डनर अँड कंपनी सूड घेण्यास आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी उत्सुक दिसत आहे.गुजरातनेही त्यांचे दोन्ही सामने गमावले आहेत. १८ फेब्रुवारीला मुंबई इंडियन्सने त्यांचा ५ विकेट्सने पराभव केला. तर २५ फेब्रुवारीला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ६ विकेट्सने त्यांना लोळवविले होते.
WPL मध्ये हेड-टू-हेड
खेळलेले सामने: ५
आरसीबी-डब्ल्यू विजयी: ३
जीजी-डब्ल्यू जिंकले: २
मागील सामन्यातील निकाल
आरसीबी-डब्ल्यू: २४ फेब्रुवारी रोजी यूपी वॉरियर्सविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव
जीजी-डब्ल्यू: २५ फेब्रुवारी रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ विकेट्सने पराभव.
दोन्ही संघ असे
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: स्मृती मानधना (सी), डॅनिएल व्याट-हॉज, एलिस पेरी, रिचा घोष (डब्ल्यूके), रघवी बिस्ट, कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, स्नेह राणा, किम गर्थ, प्रेमा रावत, रेणुका सिंग ठाकूर
गुजरात जायंट्स: बेथ मुनी (डब्ल्यूके), हरलीन देओल, फोबी लिचफिल्ड, दयालन हेमलता, ॲशले गार्डनर (सी), काशवी गौतम, डिआंड्रा डॉटिन, मेघना सिंग, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, भारती फुलमाली
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications