मोठी बातमी! वर्ल्डकपचे सामने बघा फक्त 100 रुपयात! ICC ने केली घोषणा, श्रेया घोषालचा Live परफॉर्मन्स
Women's World Cup 2025 : आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ च्या उद्घाटन सोहळ्याची घोषणा झाली आहे. भारतीय क्रिकेट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे, या कार्यक्रमात भारताची सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल परफॉर्म करणार आहे. आयसीसीने नुकतीच ही माहिती जाहीर केली असून, यामुळे भारतीय संगीतासाठी ही एक मोठी सन्मानाची गोष्ट ठरणार आहे.

श्रेया घोषाल ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि आघाडीची गायिका आहे. तिच्या मधुर आवाजाने जगभरातील कोट्यवधी चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर, वर्ल्ड कपसारख्या भव्य व्यासपीठावर ती आपली कला सादर करणार असल्याने, भारतीय संगीत जगतात उत्साहाचे वातावरण आहे.
वर्ल्ड कपचे वेळापत्रक आणि आयोजक
- स्पर्धेची सुरुवात १९ सप्टेंबर २०२५ पासून होणार.
- स्पर्धेचा कालावधी जवळपास एक महिना सात दिवस असेल.
- अंतिम सामना २६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
- या स्पर्धेत एकूण संघ एकूण १० संघ सहभागी होणार आहेत.
- आयोजक देश: भारत आणि श्रीलंका हे दोन देश संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करत आहेत.
विशेष म्हणजे, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन देश एकत्र येऊन महिला वर्ल्ड कपचे आयोजन करत आहेत. यामुळे दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
₹१०० मध्ये वर्ल्ड कप सामने, श्रेया घोषालचा लाईव्ह शो!
या स्पर्धेसाठी तिकीटांचे दर खूपच कमी ठेवण्यात आले आहेत. भारतात होणाऱ्या सामन्यांसाठी तिकीट दर फक्त ₹१०० ठेवण्यात आला आहे. पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांच्या तुलनेत महिलांच्या सामन्यांना कमी गर्दी होते. ही गर्दी वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांना स्टेडियमकडे आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे क्रिकेटप्रेमींना कमी खर्चात दोन गोष्टींचा आनंद घेता येणार आहे, यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे श्रेया घोषालचा लाईव्ह परफॉर्मन्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागतिक दर्जाच्या महिला क्रिकेट सामन्याचा थरार होय.












Click it and Unblock the Notifications