Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महिला U19 T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये गोंगडी तृषाने रचला इतिहास, 'या' खेळाडूचा मोडला विक्रम

Women's U19 T20 World Cup Gongadi Trisha's Record : भारताची ऑलराऊंडर गोंगडी त्रिशाने महिला U19 T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये इतिहास रचला. तिने आपल्या नावावर एक मोठा विक्रम केला आहे तर दुसरीकडे तिने तीन खेळाडूंना बद करत 44 धावा करत संघाला न भुतो ना भविष्यती असा वर्ल्डकप जिंकून दिला आहे.

गतविजेत्या भारतीय संघाचा सामना मलेशियात खेळल्या गेलेल्या ICC 19 वर्षाखालील T20 विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आज पराभूत केले आणि विश्वचषकावर आपले नाव कोरले. या सामन्यात टीम इंडियाची ओपनिंग बॅट्समन गोंगडी त्रिशालाही बॅटने इतिहास रचला.

Women s U19 T20 World Cup Gongadi Trisha s record

भारतीय महिला अंडर-19 संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सुरुवातीपासूनच अंतिम फेरीपर्यंत आपली अपराजित राहण्याची मालिका कायम ठेवली. टीम इंडियाचा सामना जेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिका महिला अंडर-19 संघासोबत झालेल्या सामन्यात सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा टीम इंडियाची ओपनिंग बॅट्समन गोंगडी त्रिशावर लागल्या होत्या. तिने आतापर्यंत बॅटने या स्पर्धेत जोरदार धावा केल्या. यासह आजच्या अंतिम सामन्यात तिने 44 धावा करत विक्रमाला गवसणी घातली यासह तिने भारतीय खेळाडूचा विक्रम मोडला.

गोंगडी त्रिशाची 'ती' 33 वी धावा अन् घडला इतिहास

ICC महिला अंडर-19 T20 विश्वचषक स्पर्धेत, गोंगडी त्रिशाने अंतीम सामन्यापुर्वी 6 डावात फलंदाजी केली आहे आणि 66.25 च्या उत्कृष्ट सरासरीने एकूण 265 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये तिच्या बॅटने शतकही झळकवले आहे. आता, गोंगाडीने दक्षिण आफ्रिकेच्या महिला अंडर-19 संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात 44 धावा केल्या. यासोबत ती महिला अंडर-19 T20 विश्वचषक स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आहे. तिला हा विक्रम मोडण्यासाठी 33 धावांची गरज होती.

विश्वचषका सामन्यातील 7 डावात त्रिशाने आता एकूण 309 धावा केल्या असून ती आता भारतातर्फे ICC महिला अंडर-19 T20 विश्वचषक स्पर्धेत सर्वात जास्त धावा करणारी महिला खेळाडू ठरली असून तिच्या नावावर हा विक्रम राहणार आहे.

तेवढ्या धावा केल्यानंतर तिने याआधीचा टीम इंडियाची खेळाडू श्वेता सेहरावतचा विक्रम मोडला. श्वेता सेहरावतने 2023 साली खेळल्या गेलेल्या पहिल्या अंडर-19 T20 विश्वचषकात 7 डावात 99 च्या सरासरीने एकूण 297 धावा केल्या होत्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+