बुमराह किंवा शमी नाही, रोहित शर्मानंतर 'हा' खेळाडू बनणार टीम इंडियाचा कॅप्टन, BCCI च्या डोक्यात काय?
सध्या भारतासह जगभरात आयपीएलचीच सर्वाधिक चर्चा सुरु आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगाम सध्या चांगलाच गाजत आहे. मात्र बीसीसीआयचे लक्ष्य त्यानंतर होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावर लागले आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून, रोहित शर्मा कसोटी संघात नसेल अशाही चर्चा सुरु झाल्या आहेत. मग अशा वेळी इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार कोण असेल, हा प्रश्न विचारला जात आहे. काही जणांच्या मते जसप्रीत बुमराह हा टीम इंडीयाचा कॅप्टन असेल. मात्र जसप्रीय बुमरावऐवजी या आणखी एका नव्या नावाची चर्चा सध्या टीम इंडियाच्या व्यवस्थापकांमध्ये सुरु झाली असल्याचे सांगितले जात आहे.

रोहित शर्माबद्दल ही शंका
आयपीएलच्या अगोदर न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाने कसोटी मालिका खेळली. या दोन्ही मालिकेत टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. त्यानंतर रोहितच्या फार्मविषयी व रोहितच्या कसोटी कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले. रोहित शर्मा व विराट कोहलीने यापूर्वीच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा कसोटीतूनही निवृत्ती जाहीर करील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
व्यवस्थापन कुणाच्या बाजूने?
टीम इंडियाने सलग दोन कसोटी मालिका गमावल्या असल्या तरी, त्यानंतर झालेल्या चॅम्पियन ट्राँफीत भारत अजिंक्य राहिला. त्यामुळे टीम इंडिया व्यवस्थापन व निवड समिती ही रोहित शर्माच्या बाजूने असल्याचे सांगितले जाते. दोन मालिकेत पराभव झाल्यानंतर व्यवस्थापन रोहित शर्माला कसोटीतून डच्चू देईल, अशी शक्यता खूप कमी आहे. फक्त रोहितने स्वतः कसोटीतून माघार घेतली तर मात्र निवड समितीला कर्णधाराचा पर्याय शोधावा लागेल.
बुमराह की गिल, संधी कुणाला?
यापूर्वी रोहितच्या अनुपस्थितीत झालेल्या सामन्यांत आत्तापर्यंत जसप्रीत बुमराहने टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे कदाचित रोहित शर्मा कसोटी संघात नसेल तर जसप्रीत बुमराहलाच कर्णधार केले जाईल, अशा चर्चा होत्या. दुसऱ्या बाजून मोहम्मद शमीही ज्येष्ठत्वाच्या नात्याने या पदाचा हक्कदार आहे, असेही बोलले जात होते. मात्र आता अचानक शुभमन गिलचे नावही कसोटी संघाचा कर्णधार म्हणून घेतले जाऊ लागले आहे. बुमराहची दुखापत पाहता शुभमन गिलला कर्णधार होण्याची संधी आहे, असेही बोलले जात आहे.












Click it and Unblock the Notifications