ऑटो ड्रायव्हरचा मुलगा..IPLच्या पर्दापणातच चमकला, धोनीनेही केले कौतुक; वाचा-विघ्नेश पुथूरची कहाणी
IPL 2025, Vignesh Puthur : चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात तिसरा सामना काल रविवारी दि.23 रोजी पार पडला. या खेळात मुंबई इंडियन्सचा युवा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध शानदार गोलंदाजी केली.
विशेष बाब म्हणजे, विघ्नेश पुथूरने त्याच्या कारकिर्दीत एकही देशांतर्गत सामना खेळलेला नाही, तरीही त्याला थेट आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला आणि त्याने आयपीएलच्या पर्दापणातच जोरदार कामगिरी करून दाखवली. त्याच्या कामगिरीला पाहून खुद्द एमएस धोनीने देखील त्याचे पाठीवर हात ठेऊन कौतुक केले.

विघ्नेश पुथूर हा एका ऑटो ड्रायव्हरचा मुलगा
विघ्नेश पुथूरबद्दल बोलायचे झाले तर, सध्या त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही. सामन्याच्या कॉमेंट्री दरम्यान जतिन सप्रूने सांगितले की, विघ्नेश पुथूर हा एका ऑटो ड्रायव्हरचा मुलगा आहे. त्याने मुंबई इंडियन्स स्काउट्स संघाचे लक्ष वेधून घेतले आणि नंतर त्याला आयपीएलसाठी ३० लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. त्याच्या पहिल्याच सामन्यात त्याने मुंबईचा निर्णय बरोबर असल्याचे सिद्ध केले.
विघ्नेश पुथूर मिळचा कुठला
केरळमधील मलप्पुरम येथील पुथूरने वयाच्या ११ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो त्याच्या थोड्याशा अपारंपरिक गोलंदाजी अॅक्शनमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आणि केरळ क्रिकेट लीगच्या पहिल्या हंगामात तो अॅलेप्पी रिपल्स संघाचा भाग होता. त्या स्पर्धेत पुथूरने फक्त तीन विकेट्स घेतल्या,
परंतु मुंबई इंडियन्स स्काउट्सचे लक्ष त्याने वेधून घेतले. ज्यांनी त्याला टेस्ट देण्यासाठी बोलावले. विघ्नेश पुथूरने अद्याप देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळ संघाकडून खेळलेला नाही, परंतु त्याची आयपीएल कारकीर्द खूप यशस्वी झाली आहे. २०२५ च्या आयपीएल लिलावात त्याला मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांना खरेदी केले.
𝘼 𝙙𝙧𝙚𝙖𝙢 𝙙𝙚𝙗𝙪𝙩 ✨
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
Twin strikes from the young Vignesh Puthur sparks a comeback for #MI 💙
Updates ▶️ https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @mipaltan pic.twitter.com/DKh2r1mmOx
टेस्टमध्ये चुणूक दाखवली...नतर दक्षिण आफ्रिकेला गेला
केरळ टी-२० लीगच्या पहिल्या हंगामात विघ्नेश पुथूरने फक्त तीन सामने खेळले आणि दोन विकेट घेतल्या. तथापि, या काळात त्याने मुंबई इंडियन्स स्काउटिंग संघाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर विघ्नेशला एमआयने चाचण्यांसाठी बोलावले.
चाचण्यांदरम्यान, विघ्नेशने त्याच्या अचूकतेने आणि दबावाखालीही शांत राहण्याच्या क्षमतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर जेव्हा आयपीएल २०२५ चा लिलाव झाला तेव्हा मुंबईने त्याला ३० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर जोडले.
मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने विघ्नेश पुथूरला त्याचे गोलंदाजी कौशल्य आणखी सुधारण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला पाठवले, जिथे तो एसए २० लीग संघ एमआय केपटाऊनमध्ये नेटबॉलर म्हणून सामील झाला. तिथे त्याने रशीद खान सारख्या खेळाडूंसोबत आपले कौशल्य सुधारण्याचे काम केले.
टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळण्याच्या अनमोल अनुभवामुळे त्याचा आत्मविश्वास खूपच वाढला. त्यानंतर विघ्नेशने आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी डीवाय पाटील टी-20 स्पर्धेत रिलायन्स संघाकडून तीन सामने खेळले.
The men in 💛 take home the honours! 💪
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
A classic clash in Chennai ends in the favour of #CSK ✨
Scorecard ▶ https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @ChennaiIPL pic.twitter.com/ZGPkkmsRHe
महेंद्रसिंग धोनीने विघ्नेश पुथूरच्या पाठीवर थाप मारली
विघ्नेश पुथूरने आपल्या गोलंदाजीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, सामना संपल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने विघ्नेश पुथूरच्या पाठीवर थाप दिली. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर माही विघ्नेश पुथूरच्या पाठीवर थाप मारताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय, सोशल मीडिया वापरकर्ते सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस










Click it and Unblock the Notifications