Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोण आहे उमर नझीर मीर ? 6 फूट 4 इंच उंच गोलंदाजाने रोहित-रहाणे आणि शिवम पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला

Who Is Umar Nazir Mir: रणजी ट्रॉफी 2024-25 सीझनच्या सहाव्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज गुरुवारी मुंबईच्या बीकेसी मैदानावर जम्मू आणि काश्मीरविरुद्ध अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रणजी ट्रॉफीच्या सामन्यात जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमर नझीर मीरने शानदार गोलदांजी करत रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांना बाद केले.

मीरने रोहितला शॉर्ट-पिच चेंडूवर 3 धावांवर बाद केले आणि नंतर रहाणेला 12 धावांवर क्लीन बोल्ड केलं आहे.मीरने दुबेला कन्हैया वाधवानने शून्यावर झेलबाद केलं. जम्मू आणि काश्मीरकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळलेला अनुभवी खेळाडू मीरची ही एक शानदार कामगिरी आज राहिली आहे..

umar nazir mir

मीरने 2013 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं

नझीरचा जन्म 1993 मध्ये पुलवामा येथे झाला. उमर नझीरने डिसेंबर 2013 मध्ये आसामविरुद्ध जम्मू आणि काश्मीरकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने 57 सामन्यांमध्ये 138 विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 54 विकेट्स आहेत. टी-20 मध्ये या वेगवान गोलंदाजाने 32 विकेट्स घेतल्या आहेत. पुलवामा येथील रहिवासी 6 फूट 4 इंच उंची असलेल्या मीरची 2018-19 देवधर ट्रॉफीसाठी इंडिया सी संघात निवड झाली.

गुरुवारी मुंबई विरुध्द जम्मू आणि काश्मीर रणजी ट्रॉफी सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याचा कसोटी सलामीवीर यशस्वी जयस्वालला त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये स्वस्तात बाद केलं

रोहित आणि जयस्वालने गतविजेत्या मुंबईसाठी पहिल्यांदाच सलामीवर म्हणून घरच्या मैदानावर मैदानावर उतरले. मात्र या दोन्ही जोडीदारांसाठी स्थानिक क्रिकेटमधलं पुनरागमन काही खास राहिलं नाही. मुंबईच्या बीकेसी मैदानावर जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीने जयस्वालला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

मुंबई विरुद्ध जम्मू आणि काश्मीर संघ

जम्मू आणि काश्मीर: शुभम खजुरिया, विवरांत शर्मा, अब्दुल समद, पारस डोगरा (कर्णधार), कन्हैया वाधवान (यष्टीरक्षक), आकिब नबी दार, यावर हसन, युद्धवीर सिंग चरक, आबिद मुश्ताक, उमर नजीर मीर, वंश शर्मा.

मुंबई: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक तामोर (यष्टीरक्षक), शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुश कोटियन, मोहित अवस्थी, कर्ष कोठारी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+