सुरेश रैनाला प्रश्नात अडकवून क्लीन बोल्ड करणारी सुंदर अँकर कोण, Video व्हायरल, नेटकऱ्यांची टीका!
Suresh Raina viral video : भारताचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे, कारण वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स दरम्यानचा त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये तो प्रसिद्ध अँकर अदिती बुधाथोकी हिच्या प्रश्नांना उत्तरे देत आहे. हा रॅपिड फायर राउंड रैनाच्या मजेदार उत्तरांमुळे खूप मनोरंजक ठरला, पण एका प्रश्नामुळे तो अडकला.

रैनाने दिले 'चुकीचे' उत्तर
अदिती बुधाथोकीने रैनाला काही वेगवान प्रश्न विचारले, ज्यांची त्याने तत्काळ उत्तरे दिली. क्रिकेटचा राजा कोण? - विराट कोहली, सर्वात जास्त वेग कोणाचा? - ब्रेट ली, 'गोल्डन आर्म'? - सुरेश रैना (स्वतः), सर्वात मजेदार क्रिकेटर? - भज्जी (हरभजन सिंग), सर्वात स्टायलिश क्रिकेटर? - युवराज सिंग
या प्रश्नांनंतर, अदितीने रैनाला क्रिकेटवर आधारित तीन चित्रपटांची नावे विचारली. यावर रैनाने 'एमएस धोनी', 'चक दे इंडिया' आणि 'लगान' अशी उत्तरे दिली. यातील 'चक दे इंडिया' हे उत्तर चुकीचे होते, कारण हा चित्रपट क्रिकेटवर नाही, तर हॉकी या खेळावर आधारित आहे. विशेष म्हणजे, चुकीचे उत्तर दिल्यानंतरही अँकरने रैनाला थांबवले नाही.
सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव
रैनाच्या या चुकीमुळे सोशल मीडियावर अनेकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटले की, "अँकर खूप सुंदर आहे, तिला पाहिल्यानंतर रैना बरोबर उत्तर विसरला." तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, "कदाचित रैनाप्रमाणेच, अँकरलाही बरोबर उत्तर माहीत नसेल." या चुकीमुळे रैनापेक्षा जास्त चर्चा अँकर अदिती बुधाथोकी हिच्या सौंदर्याची होत आहे.
अदिती बुधाथोकी कोण आहे?
अदिती बुधाथोकी ही मूळची नेपाळी असून, नेपाळमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अलीकडेच अँकरिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवले असून, कमी वेळातच तिला चांगली प्रसिद्धी मिळाली आहे. अभिनय कारकीर्द : तिने 2018 मध्ये 'क्री' या नेपाळी चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली.
म्युझिक अल्बम: तिने मिलिंद गाबासोबत एका पंजाबी अल्बममध्ये काम केले आहे. याशिवाय ती 'हवा बनके' आणि 'तुम जहाँ रहो' यांसारख्या अल्बम्समध्येही दिसली आहे.
सध्याचे निवासस्थान कुठे राहती?
अदिती सध्या मुंबईत राहते. रैनाच्या चुकीमुळे सुरू झालेल्या या व्हिडिओच्या चर्चेमुळे अदिती बुधाथोकी पुन्हा एकदा लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे.












Click it and Unblock the Notifications