India vs PM XI: भारताविरुद्ध शतक झळकावणारा 19 वर्षीय सॅम कोन्टास कोण आहे? घ्या जाणून
Prime Ministers XI vs India: कॅनबेरा येथे रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हन सराव सामन्यात 19 वर्षीय सॅम कॉन्स्टासने धडाकेबाज शतक झळकावलं आहे. ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हनसाठी कॉन्स्टासने डावाच्या सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांची धुलाई केली आहे. तर बाजूने दुसऱ्या टोकाला विकेट पडत होत्या. कॉन्स्टासने आपल्या शतकी खेळीत 14 चौकार आणि 1 षटकार लगावत शतक केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या पीएम इलेव्हन संघाने सर्व विकेट गमावून 240 धावा केल्या आहेत.

90 चेंडूत पूर्ण केले शतक
क्लेटन बाद झाल्यानंतरही कॉन्स्टासने आपले शानदार फटके मारणे सुरूच ठेवले. सामन्याच्या 38व्या षटकात 97 चेंडूत 107 धावा करून तो बाद झाला. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या सुरुवातीपूर्वी डेव्हिड वॉर्नरच्या जागी कॉन्स्टासचा संघात समावेश करण्यात आला होता. ॲडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी त्याने आपली गुणवत्ता सर्वांना दाखवून दिली आहे. त्याच्या शानदार शतकानंतर आता सर्वांच्या नजरा ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांवर आहेत.
सॅम कॉन्स्टास कोण आहे?
2 ऑक्टोबर 2005 रोजी जन्मलेला उजव्या हाताचा कॉन्स्टास हा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगतात तो खूप लोकप्रिय आहे. नुकतेच त्याने आपल्या देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघ आणि न्यू साउथ वेल्स या दोन्ही संघांसाठी खेळला आहे. ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत टूर्नामेंट शेफिल्ड शिल्डच्या पहिल्या सामन्यात दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक झळकावल्यानंतर 19 वर्षीय कोन्टास प्रथम प्रकाशझोतात आला होता. त्याच्या या खेळीमुळे 1993 मध्ये दिग्गज खेळाडू रिकी पॉन्टिंगनंतर ही कामगिरी करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघात कॉन्स्टासचा जुलै 2023 मध्ये समावेश करण्यात आला होता. नोव्हेंबर 2023 मध्ये त्याने तस्मानियाविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. कॉन्टासने डिसेंबर 2023 मध्ये सिडनी थंडरसोबत त्याच्या पहिल्या व्यावसायिक करारावर स्वाक्षरी केली. त्याच महिन्यात 2024 अंडर-19 क्रिकेट विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघात कॉन्स्टासचाही समावेश करण्यात आला होता. येथे वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावताना त्याने 121 चेंडूत 108 धावा केल्या होत्या.












Click it and Unblock the Notifications