हार्दिक पांड्याकडे आहे करोडोंची संपत्ती, नताशा काही कमी नाही, जाणून घ्या या दोघांमध्ये कोण श्रीमंत
Hardik Pandya and Natasa Stankovic Net Worth: हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात मतभेद आणि घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या, आता हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी त्या सर्व बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. दोघांनीही आपापल्या सोशल मीडियावर त्यांच्या विभक्त झाल्याची माहिती दिली आहे.

नुकताच हार्दिक पांड्या टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर बडोद्यात आला होता. तिथे त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. आता त्यांनी भावनिक पोस्टमध्ये घटस्फोटाची बातमी दिली. सर्बियन मॉडेल नताशा एक दिवस आधीच तिच्या देशात गेली होती. मुंबई विमानतळावर ती स्पॉट झाली होती. हार्दिक आणि नताशा या दोघांकडे पैशांची कमतरता नाही. तर चला मग बघूया दोघांमध्ये कोण श्रीमंत आहे.
जर आपण हार्दिक पांड्याच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर ते 100 ते 120 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून दरवर्षी 15 कोटी रुपये मिळतात. हार्दिक पांड्याला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून दरवर्षी 5 कोटी रुपये मिळतात. याशिवाय त्यांला जाहिरातींमधूनही पैसे मिळतात. ब्रँड्समध्ये गल्फ ऑइल, स्टार स्पोर्ट्स, मॉन्स्टर एनर्जी आणि ओप्पो यांचा समावेश आहे. या एंडोर्समेंट डील्सचा त्याच्या उत्पन्नात मोठा वाटा आहे, असा अंदाज आहे की, तो एकट्या ब्रँड एंडोर्समेंटमधून वर्षाला सुमारे 10-12 कोटी रुपये कमावतो.
आता नताशाबद्दल बोलायचे झाले तर तिचीही कमाई करोडोंमध्ये आहे. जर आपण नताशाच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर ती सुमारे 20 कोटी रुपयांची मालकीण आहे. ती भारतीय चहा उद्योगाशी संबंधित आहे. इन्स्टाग्राम प्रमोशनमधूनही ती कमावते. नताशा जाहिरातींमधूनही कमाई करते.
जर आपण दोघांची तुलना केली तर नताशा हार्दिकच्या संपत्तीच्या जवळपास ही नाही. हार्दिक पांड्या तिच्यापेक्षा पाचपट श्रीमंत आहे. पंड्या अजूनही व्यावसायिक क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. येत्या काही वर्षांत त्याची कमाई आणि एकूण संपत्ती आणखी वाढेल. दोघांनी 2020 मध्ये गुपचूप लग्न केले. त्यानंतर गेल्या वर्षी उदयपूरमध्ये एका शानदार सोहळ्यात दोघांनी पुन्हा लग्न केले.












Click it and Unblock the Notifications