Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मनूला एकेकाळी क्रिकेटपटू व्हायचं होतं, आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत पोहोचून रचला इतिहास

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक मधून एक आनंदाची बातमी आहे. जिथे भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला आहे. यावेळी तिने तिसरा क्रमांक मिळवला आहे. खरं तर 20 वर्षांनंतर एका भारतीय महिला नेमबाजने ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत मनू पोहोचू शकली नव्हती. शेवटच्या क्षणी पिस्तुलमधील तांत्रिक बिघाडामुळे तिला अंतिम फेरीतील तिचे स्थान हुकले होते. मात्र या ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठून देशाच्या पदकाची आशा जागवली आहे. सर्वांना जाणून घ्यायचे आहे की,ही मनू भाकर कोण आहे? तर चला मग जाणून घेऊया.

manu bhaker

नेमबाजी व्यतिरिक्त मनूला इतर खेळांमध्येही रस

25 वर्षीय मनू भाकर ही हरियाणातील झज्जरमधील गोरिया गावची रहिवासी आहे. वडील राम किशन भाकर मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहेत. शूटिंगपूर्वी मनूने कराटे, थांग टा, टांटा, स्केटिंग, स्विमिंग आणि टेनिसमध्ये स्वत:ला आजमावले आहे. मनू ही कराटे, थांग टा आणि टांटा या प्रकारात राष्ट्रीय पदक विजेती आहे. तंटा 3 वेळा राष्ट्रीय चॅम्पियन आहे. स्केटिंगमध्ये राज्य पदक जिंकले. शाळेत पोहणे आणि टेनिस खेळलं आहे.

क्रिकेटर होण्यासाठी वीरेंद्र सेहवागच्या अकादमीतही सहभागी झाली

एक काळ असा होता की, मनू भाकरला क्रिकेटमध्ये करिअर करायचे होते. क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी ती झज्जर येथील भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या अकादमीतही सहभागी झाली होती. जिथे तिने काही काळ क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. पण यानंतर ती पिस्तुल नेमबाजीत आली आणि त्यात प्रगती करत राहिली.

अशी झाली पिस्तुल शूटर

एके दिवशी मनू भाकर तिच्या वडिलांसोबत शूटिंग रेंजला गेली होती. जिथे शूटींग सुरु होती तिथे मनुने 10 क्रमांकाचे लक्ष्य अचूक टिपले . हे पाहून वडील राम किशन यांनी मनूला प्रोत्साहन दिले आणि मनूला नेमबाजीच्या युक्त्या शिकण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षक यशपाल राणा यांच्याकडे पाठवले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

बोल्टचे आत्मचरित्र वाचून प्रेरणा मिळाली

मनू भाकर टोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरीने निराश झाली होती. त्यावेळी ती काही काळ शूटिंगपासून दूर राहिली होती. स्वतःला प्रेरित करण्यासाठी मनू भाकरने उसेन बोल्ट पाहून त्याचे आत्मचरित्र वाचले आणि त्यातून तिला प्रेरणा मिळाली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+