Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोण आहेत प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा? ज्यांच्यासाठी CSK ने 28.40 कोटी खर्च केले; जाणून घ्या करीअर

Who Are Prashant Veer and Kartik Sharma : आयपीएल २०२६ च्या लिलावाने क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. या लिलावात अनुभवी खेळाडूंपेक्षाही युवा आणि 'अनकॅप्ड' (आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेले) खेळाडूंनी सर्वाधिक भाव खाल्ला. यामध्ये सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या दोन युवा खेळाडूंची. चेन्नई सुपर किंग्सने या दोघांनाही आपल्या संघात घेण्यासाठी प्रत्येकी १४.२० कोटी रुपये खर्च केले आहेत.

Who Are Prashant Veer and Kartik Sharma

या ऐतिहासिक बोलीमुळे प्रशांत आणि कार्तिक हे आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू ठरले आहेत. चेन्नईने या दोन खेळाडूंसाठी एकूण २८.४० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली आहे.

कोण आहे कार्तिक शर्मा? (who is Kartik Sharma)

  • १९ वर्षीय कार्तिक शर्माला मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळाली. शेवटी १४.२० कोटींची बोली लावून चेन्नईने बाजी मारली.
  • एप्रिल २००६ मध्ये जन्मलेला कार्तिक मूळचा राजस्थानचा आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि यष्टिरक्षक आहे.
  • कार्तिकने २०२४-२५ च्या रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पणातच शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले होते.
  • २०२५ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने राजस्थानकडून दमदार कामगिरी केली.
  • मध्यमवर्गीय कुटुंबातील कार्तिक हा विराट कोहली आणि एमएस धोनी यांचा मोठा चाहता असून त्यांच्याकडूनच तो प्रेरणा घेतो.

कोण आहे प्रशांत वीर? (who is Prashant Veer)

  • उत्तर प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू प्रशांत वीर याच्यासाठीही मोठी बोली लागली. ३० लाखांची बेस प्राईस असलेल्या प्रशांतसाठी चेन्नईने आकाश-पाताळ एक केले.
  • २४ नोव्हेंबर २००५ रोजी जन्मलेला प्रशांत हा डावखुरा फलंदाज आणि स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाज आहे.
  • प्रशांत वीर खऱ्या अर्थाने चर्चेत आला तो UP T20 League मुळे. या स्पर्धेत त्याने १० सामन्यांत १५५.३४ च्या स्ट्राईक रेटने ३२० धावा केल्या आणि ८ बळीही टिपले.
  • खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याच्या आक्रमक खेळामुळेच सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सनेही त्याच्यासाठी मोठी बोली लावली होती.

CSK चे लिलावातील सर्वात मोठे खरेदी (IPL 2026)

१. कार्तिक शर्मा याला १४.२० कोटी रुपयांत तर प्रशांत वीर याला १४.२० कोटी रुपये एवढी बोली लागली. चेन्नई सुपर किंग्सने या दोन युवा खेळाडूंवर लावलेला मोठा डाव आगामी हंगामात किती यशस्वी ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+