चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बक्षिसांची रक्कम जाहीर, विजेत्या संघावर पैशांचा वर्षाव
Champions Trophy 2025 Prize Money: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आठ वर्षांनी पुनरागमन करत आहे. पाकिस्तान संघाकडे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील अव्वल आठ संघांचा सहभाग असणार आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत 19 दिवस चालणार आहे. युएई येथे होणाऱ्या या स्पर्धेत चाहत्यांसाठी उच्च दर्जाचा खेळ आणि संघांसाठी मोठ्या बक्षीस रकमेचे देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी संघाना दोन ग्रुप करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येकी चार संघांच्या दोन गटात विभागण्यात आलं आहे, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ नॉकआउटमध्ये पोहचतील. या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम $6.9 दशलक्ष (रु. 59.9 कोटी) पर्यंत पोहोचली आहे, जी 2017 च्या सीझनपेक्षा 53 टक्क्यांनी जास्त आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल?
स्पर्धेतील विजेत्या संघाला $2.24 दशलक्ष (USD) (19.45 कोटी रुपये) मिळतील. याशिवाय उपविजेत्याला $1.12 दशलक्ष (9.72 कोटी रुपये) बक्षीस दिले जाईल. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना अनुक्रमे 5,60,000 अमेरिकन डॉलर्स मिळतील. ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये 4.86 कोटी रुपये आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील आठही संघांना किती पैसे मिळतील?
पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना USD 350,000 (रु. 3.04 कोटी) बक्षीस दिले जाईल, तर सातव्या किंवा आठव्या स्थानावर असलेल्या संघांना USD 140,000 (रु. 1.21 कोटी) बक्षीस दिले जाणार आहे.
स्पर्धेतील सर्व संघांवर पैशांचा पाऊस
आयसीसीने 2025 च्या आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या सर्व आठ संघांना अतिरिक्त $125,000 देण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे या वर्षीच्या स्पर्धेतील संघांना चांगली रक्कम मिळणार आहे.












Click it and Unblock the Notifications