हे ‘5’ रेकॉर्ड्स जे विराट कोहली मोडू शकला नाही
क्रिकेटचा किंग विराट कोहलीने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विराट कोहलीच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना आणि क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, विराट कोहलीने आतंरराष्ट्रीय स्तरावर अनेक विक्रम मोडले आहेत. मात्र कसोटीतून निवृत्ती घेतल्यामुळे आता विराट काही विक्रमांपासून लांबच राहणार आहे. विराट मोडू शकला नाही असे रेकॉर्ड्स या बातमीतून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

इंग्लंडमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा
जर विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर गेला असता तिथे सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्याची संधी होती. विराटने इंग्लंडमध्ये १७ कसोटी सामन्यांमध्ये ३३ च्या सरासरीने १०९६ धावा केल्या आहेत. सचिनने इंग्लंडच्या भूमीवर ३० डावांमध्ये ५४ च्या सरासरीने १५७५ धावा केल्या आहेत. मात्र निवृत्तीमुळे विराट हा रेकॉर्ड मोडू शकणार नाही.
कसोटी सामन्यांमध्ये १०,००० धावा
एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणे हे एका महान फलंदाजाचे वैशिष्ट्य असते. विराटने एकदिवसीय सामन्यांमध्ये हे केले आहे पण सध्या त्याच्याकडे कसोटी सामन्यांमध्ये फक्त ९२३० धावा आहेत. कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्यामुळे विराट आता १०,००० धावांचा पल्ला गाठू शकणार नाही.
सर्वाधिक कसोटी विजय
भारताने आतापर्यंत ५८९ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यापैकी १८१ सामने जिंकले आहेत. सचिन तेंडुलकरने जास्तीत जास्त ७२ विजयांमध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग म्हणून काम केले आहे. विराटने ६२ सामने जिंकले आहेत. त्याला सचिनचा विक्रम मोडण्याची होती. पण निवृत्तीमुळे आता रेकॉर्डही सचिनच्या नावावर राहील.
जिंकलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा
विराट कोहलीला जिंकलेल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्याची संधी होती. सचिनने ७२ कसोटी सामन्यांच्या ११३ डावांमध्ये ५९४६ धावा केल्या होत्या. विराटने आतापर्यंत ४७४६ धावा केल्या आहेत. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी त्याला १२०१ धावांची आवश्यकता होती.
WTC मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. माजी भारतीय कर्णधाराने ४० सामन्यांमध्ये २७१६ धावा केल्या आहेत. रोहित निवृत्त झाला आहे. विराट ४६ सामन्यांमध्ये २६१७ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. विराटच्या निवृत्तीमुळे रोहितचा विक्रम अबाधित राहीला आहे.












Click it and Unblock the Notifications