Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND Vs PAK: कोहलीने रचला इतिहास, क्रिकेटच्या देवालाही टाकले मागे, 'या' विक्रमाने बनला नंबर वन...

India vs Pakistan, Virat Kohli sets new record : भारतीय संघाचा रनगन मॅन विराट कोहलीने आपल्या नावावर एक ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. त्याने क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडला आहे. कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14 हजार धावा करणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे.

कोहलीने 299 व्या एकदिवसीय सामन्याच्या 287 व्या डावात ही कामगिरी पूर्ण केली आहे. यापूर्वी हा विक्रम सचिनच्या नावावर होता, ज्याने 350 व्या डावात हा विक्रम केला होता. सचिननंतर श्रीलंकेचा कुमार संगकाराने 378 डावांमध्ये 14 हजार एकदिवसीय धावा केल्या होत्या.

virat kohli

झेल घेण्याचा विक्रमातही अव्वल स्थानी विराट

विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यातील 158 वा झेल घेऊन सर्वाधिक एकदिवसीय झेल घेणारा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (156 झेल) यांना मागे टाकले.

सर्वाधिक झेल घेणारे भारतीय खेळाडू

विराट कोहली - 157
मोहम्मद अझरुद्दीन - 156
सचिन तेंडुलकर - 140
राहुल द्रवीड - 124
सुरेश रैना - 102

विराट कोहलीने यांना टाकले मागे

रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामन्यात विराट कोहलीने दोन झेल घेतले. त्याने आता 299 एकदिवसीय सामन्यांमध्ये 158 झेल घेतले आहेत. कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू बनला आहे. तो एकूण यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

रोहितने सचिनचा हा विक्रमही मोडला

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात एक धाव काढताच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. तो सलामीवीर म्हणून एकदिवसीय सामन्यात 9000 धावा करणारा फलंदाज बनला आहे.

रोहितने 181 एकदिवसीय डावांमध्ये सलामीवीर म्हणून ही कामगिरी केली. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता ज्याने 197 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+