IPLच्या धामधुमीत विराट-अनुष्का अयोध्येच्या राम मंदिरात दर्शनासाठी पोहोचले, चाहत्यांची गर्दी, Video
Virat Kohli and Anushka Sharma In Ayodhya Ram Mandir : विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा आज (25 मे) अचानक पहिल्यांदाच कारने थेट अयोध्येला पोहोचले. सकाळी सात वाजता दोघांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात सुमारे अर्धा तास राहिले. राम दरबार आणि संपूर्ण मंदिर पाहिले. या ठिकाणी दोघांनीही पुजाऱ्यांकडून राम मंदिराच्या मूर्ती आणि कोरीवकामाची माहिती घेतली.

यानंतर विराट आणि अनुष्का हनुमानगढीला पोहोचले. 20 मिनिटे दर्शन-पूजा केली. त्यानंतर तेथून त्यांनी लखनऊ गाठले. विराट अनुष्काच्या आगमनाने राम मंदिर व हनुमान गढीच्या परिसरात भाविकांसह त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
#WATCH | Uttar Pradesh: Indian Cricketer Virat Kohli, along with his wife and actor Anushka Sharma, visited and offered prayers at Hanuman Garhi temple in Ayodhya. pic.twitter.com/pJAGntObsE
— ANI (@ANI) May 25, 2025
त्यांच्या भेटीदरम्यान या जोडप्याने हनुमान गढीचे महंत ज्ञान दास यांचे उत्तराधिकारी आणि संकट मोचन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय दत्त यांचीही भेट घेतली. हनुमान गढीचे वरिष्ठ पुजारी हेमंत दास यांनी विराट अनुष्काकडून पूजा करून घेतली.
यापूर्वी दाम्पत्य वृंदावनला गेले होते दर्शनासाठी
यापूर्वी, 13 मे रोजी, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी, विराट आणि अनुष्का वृंदावनला पोहोचले. दोघांनीही प्रेमानंद महाराजांना नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रेमानंद महाराजांनी विराट आणि अनुष्काला विचारले - तुम्ही आनंदी आहात का? यावर विराट हसला आणि म्हणाला, हो.
23 मे रोजी लखनऊच्या एकाना स्टेडियमवर कोहलीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल सामना खेळला. त्यात त्याचा संघ आरसीबी 42 धावांनी पराभूत झाला. या सामन्यात कोहलीने 25 चेंडूत 43 धावा करून संघाला दमदार सुरुवात दिली. आरसीबीचा पुढील सामना 27 मे रोजी लखनऊविरुद्ध होणार आहे.












Click it and Unblock the Notifications