Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बंगळुरु चेंगराचेंगरीच्या दिवशी नम्मा मेट्रोच्या गेटवरून लोकांनी मारल्या उड्या, RCB चाहत्यांचा Video

आयपीएल-2025 च्या विजयी सोहळ्याला बंगळुरुमध्ये गालबोट लागले. या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत सुमारे 11 लोकांचा जीव गेला. आरसीबीच्या दुःखद विजयाच्या जल्लोषाचे भयानक व्हिडिओ आता समोर येऊ लागले आहेत. अशातच एक व्हिडिओ आता पुन्हा व्हायरल झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) चाहत्यांना मेट्रो स्टेशनच्या गेटवरून उड्या मारताना, तिकीट प्रणाली बायपास करून नम्मा मेट्रो परिसरातून धावताना दिसले आहे, त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

बेंगळुरू अपडेट्स या लोकप्रिय इंस्टाग्राम पेजने पहिल्यांदा शेअर केलेल्या या फुटेजमध्ये 4 जून रोजी गर्दी असलेल्या मेट्रो स्टेशनवर शेकडो प्रवासी गेटवरून उडी मारताना दिसत आहेत - त्याच संध्याकाळी चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

viral video rcb fans jumping namma metro

नम्मा मेट्रो मॅडनेस : रेकॉर्डब्रेकिंग गर्दी

बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) नुसार, नम्मा मेट्रो सिस्टीममध्ये त्या दिवशी 9 लाख 66 हजार 732 प्रवाशांसह विक्रमी प्रवाशी संख्या होती. जी त्याच्या इतिहासातील सर्वाधिक होती. आरसीबीच्या आयपीएल 2025 च्या विजेतेपदाच्या विजयामुळे आणि मध्य बेंगळुरूमध्ये शेवटच्या क्षणी झालेल्या सत्कार समारंभाच्या घोषणेमुळे ही गर्दी झाली. शहराच्या मध्यभागी हजारो लोक जमले असताना, मेट्रो स्थानके गोंधळलेली होती. गर्दी नियंत्रणाच्या कमकुवत उपाययोजनांमुळे आणि प्रमुख स्थानकांवर थांबलेल्या रेल्वे थांब्यांमुळे अशांततेला कारणीभूत ठरले.

नेटकरी काय म्हणाले?

व्हायरल व्हिडिओमुळे ऑनलाइन प्रतिक्रियांचा वर्षाव झाला आहे. अनेक नेटिझन्सनी या वर्तनाचा निषेध केला आहे आणि म्हटले आहे की हे नागरिकांच्या जाणिवेचा अभाव दर्शवते. "उत्सुकता चांगली आहे, परंतु शिस्त आणि सुरक्षिततेशी कधीही तडजोड केली जाऊ नये.

एका वापरकर्त्याने टिका केली की, नागरिक जाणिवेचा कुठे आहे? गेटवरुन उडी मारणे निरुपद्रवी वाटू शकते, परंतु अशा गर्दीत ते धोकादायक आहे. दुसऱ्याने लिहिले की, इतरांनी परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. एका वापरकर्त्याने असा दावा केला की ट्रेन रद्द झाल्याने अनेक प्रवासी तासनतास मेट्रो परिसरात अडकले होते, बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. त्यावेळी लोकांनी अशा उड्या मारून बाहेर पडणे पसंद केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+