Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! विनोद कांबळेची प्रकृती बिघडली, भावाची माहिती म्हणाला- बरे होण्यासाठी प्रार्थना करा!

Vinod Kamble's health deteriorated brother's information : भारताचा माजी स्टार फलंदाज विनोद कांबळे हा आपल्या आरोग्याशी निगडित समस्यामुळे संघर्ष करत आहे, माजी क्रिकेटपटू संदर्भात त्याचा भाऊ वीरेंद्र कांबळे यांनी मोठे अपडेट दिले आहे. हे अपडेट चाहत्यांची चिंता वाढवणारे आहे, विनोद कांबळी बऱ्याच काळापासून आजारी आहे आता त्यांची प्रकृती पूर्वीच्या तुलनेत आता बिघडली आहे.

Vinod Kamble s health

विनोद कांबळीचा भाऊ वीरेंद्र कांबळे यांच्या माहितीनुसार, विनोद कांबळे सध्या घरी असून लवकर बरा होण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र सध्या त्याला चालायला आणि फिरायला समस्या होत आहे. या संदर्भात वीरेंद्र कांबळे यांनी म्हटले की, आपला भाऊ विनोद कांबळे याच्यावर दीर्घ काळ उपचार करावे लागतील आणि बरे होण्यासाठी वेळ लागेल.

विनोद कांबळी बरा होण्यासाठी प्रार्थना करा..- विरेंद्र कांबळी

विरेंद्र कांबळी यांनी चाहत्यांना आवाहन केलं की, विनोद कांबळी याला लवकरात लवकर बरं करण्यासाठी प्रार्थना करावी. कारण गेल्यावेळीही विनोद कांबळीला रुग्णालयात दाखल करावे लागले होते, युरीन इन्फेक्शनचे निदान झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले होते.

विनोद कांबळेला कोणता आजार आहे?

प्राप्त माहितीनुसार आणि मीडिया रिपोर्टनुसार मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये विनोद कांबळे युनिव्हर्सिटी इन्फेक्शन झालं होतं. त्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी तपासणी दरम्यान त्याच्या मेंदूमध्ये क्लाॅट दिसून आला होता, यानंतर उपचार करण्यात आले आणि त्यांना सुट्टी देण्यात आली होती. सध्या फिजिओथेरपीच्या सल्ल्यानुसार डॉक्टरांनी विनोद कांबळेला आजाराचा आरामाचा सल्ला दिला आहे.

विनोद कांबळे यांची संपूर्ण तपासणी करण्यात आली होती आणि अनेक चाचण्याही पार पडल्या होत्या त्यानंतरही त्यांच्या रिपोर्टमध्ये काही गडबड आहे असे दिसून आले नाही, मात्र चालण्याला आणि फिरण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागत आहे.

सचिनसोबत कांबळी व्यासपीठावर दिसला होता..

विनोद कांबळे गेल्यावर्षी त्याची गुरू रमाकांत आचरेकर यांच्या पुतळ्याच्या विमोचन प्रसंगी जाहीर कार्यक्रमात दिसून आला होता. त्यावेळी मास्टर ब्लास्टर दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर सोबत तो दिसून आला होता, तेव्हा विनोद कांबळे अस्पष्ट बोलत होता आणि प्रकृतीही फारशी बरी नव्हती हे दिसून आले होते. त्यानंतर विनोद कांबळी संदर्भात अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+